For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अगोदर भांडण...नंतर एकी...आणि खून ! एकमेकांकडे रागाने बघण्यावरून युवकाला ठेचले

01:44 PM Jun 12, 2024 IST | Abhijeet Khandekar
अगोदर भांडण   नंतर एकी   आणि खून   एकमेकांकडे रागाने बघण्यावरून युवकाला ठेचले
Advertisement

सांगली प्रतिनिधी

संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीवनगर येथील इमाम हुसेन मस्जिदच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर एकाचा डोक्यात दगड घालून तिघांनी निर्घृणपणे खून केला. खून झालेल्या युवकाचे नाव मयुरेश यशवंत चव्हाण वय 30 रा. शांतिनिकेतनच्या मागील बोळाज प्लॉट सांगली. मूळ गाव भेंडवडे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर असे आहे. दारू पित असताना एकमेकांकडे रागाने का पाहिलेस म्हणून हा खून केला आहे, अशी प्राथमिक माहिती संजयनगर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या बारा तासात तीन संशयितांना अटक केली.

Advertisement

याबाबत माहिती अशी की, मयत मयुरेश चव्हाण हा एका मोठ्या खासगी दवाखान्यात काम करतो. त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे तो उत्तर शिवाजीनगर येथील एका दारूच्या दुकानात सोमवारी रात्री दारू पित बसला होता. त्याठिकाणी आणखीन तिघे आले होते. तेही दारू पित असतानाच त्यांची मयुरेश चव्हाण याची नजरानजर झाली. त्यामध्ये चव्हाणने आपल्याकडे रागाने पाहिले आहे असा गैरसमज त्या तिघांनी केला आणि त्यातून या तिघांची आणि मयुरेश याची वादावादी झाली. जोरदार भांडण झाले. नंतर हे भांडण सोडविण्यात आले. त्यानंतर या तिघांची आणि मयुरेशची एकी झाली.

पुन्हा दारू पिण्यासाठी गेल्यानेच घात
मयुरेश आणि संशयित तिघांची भांडण झाल्यानंतर ते भांडण मिटले आणि एकी झाल्यावर या एकीसाठी आणखीन दुसऱ्या दुकानात दारू पिण्याचा निर्णय या चौघांनी घेतला आणि ते होळकर चौक येथील दारूच्या दुकानात दारू पिण्यासाठी आले. पण तेही दुकान बंद असल्याने तसेच पुढे जात असताना या तिघाचे आणि मयुरेशचे रस्त्यात भांडण झाले आणि या भांडणातून या तिघांकडून मयुरेशवर हल्ला करण्यात आला. यामध्ये दोघांनी थेट मयुरेशच्या डोक्यात दगड घातला त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि खाली पडला त्यानंतर या संशयितांनी आणखीन दगड त्याच्या डोक्यात घातला आणि त्याठिकाणाहून पळ काढला. पुन्हा दारू पिण्यासाठी हे एकत्र गेले नसते तर मयुरेशचा घात झाला नसता.

Advertisement

संशयितांना ताब्यात घेतल्यावरही ते नशेतच
मयुरेशच्या खुनाची माहिती सकाळी संजयनगर पोलिसांना समजल्यावर तात्काळ त्यांनी तपास चक्रे सुरू केली त्यावेळी मयुरेश ज्या दारूच्या दुकानात दारू पित होता. त्याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली असता भांडण करणारे तिघे संशयित पोलीसांच्या लक्षात आले आणि त्यांनी तात्काळ त्याना ताब्यात घेतले त्यावेळीही हे तिघेही नशेतच होते. त्याच्याकडे नशा उतरल्यावर चौकशी केली असता त्यानी खुनाची कबुली दिली आणि एकमेकांकडे बघण्यावरून आमचा वाद झाला होता आणि त्यातून हा खून करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

12 तासात संशयित अटकेत
मयत मयुरेश हा मुळचा भेंडवडे येथील आहे. त्याच्या पश्चात आई-वडिल आहेत. तो सांगलीत शांतिनिकेतनजवळ मामाच्या घरी राहत होता. याप्रकरणी त्याचा मामा हणमंत रामचंद्र शिंदे रा. शांतिनिकेतनजवळ सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार संजयनगर पोलीसांनी प्रतिक रामचंद्र शितोळे वय 23 रा. जुना कुपवाड रोड, शामनगर सांगली, गणेश जोतीराम खोत वय 30 रा. माळी गल्ली, माळी वस्ती संजयनगर, सांगली आणि सिध्दनाथ राजाराम लवटे, वय 25 सध्या रा. माळी गल्ली, माळी वस्ती, संजयनगर सांगली. मुळ रा.इरळी, ता. कवठेमहांकाळ, सांगली या तिघांना अटक केली आहे.

संजयनगर पोलिसांची तात्काळ कारवाई
या खुनाची माहिती समजताच संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बयाजी कुरळे यांनी तात्काळ या खुनाच्या संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार संजयनगर पोलीसांनी कोणतीही माहिती नसताना या तिघा संशयिताना अटक केली आहे. ही कारवाई सुरज सदामते, विनोद साळुंखे, नवनाथ देवकते, अशोक लोहार, दीपक गायकवाड, सुशांत लोंढे यांनी केली.

Advertisement
Tags :

.