Sangli Politics : सांगली महापालिका निवडणूक; महायुती–आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम
सांगली मनपासाठी राजकीय गणित बिघडले
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली मात्री महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटपात घोडं अडलेलेच आहे. सर्व पक्षांकडून जादाच्या जागांची मागणी केली जात असल्याने अंतिम निर्णय होत नसल्याचे चित्र आहे.
निवडणूकीचा बिगुल वाजला असून अर्ज भरण्याची प्रकिया सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी भाजपा, राष्ट्रवादी अजितदादा पवार, शिवसेना शिंदे, तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना ठाकरे गट या सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार तयारी केली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडी होणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
युती आणि आघाडीतील सर्वच पक्षांकडून जादा जागांची मागणी केली जात असल्याने अंतिम निर्णय झालेला नाही. महायुतीतमध्ये भाजपाला सर्वाधिक म्हणजे ५० हुन अधिक जागांची अपेक्षा आहे. अजितदादा पवार पक्षानेही ३० जागांची मागणी केली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत एकमत झाले नाही. जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने तसेच राष्ट्रवादी अजितदादा पश्चात मिरजेतून झालेले अनेक आजी-माजी नगरसेवक आणि महापौर यांच्यामुळे मिरजेतून त्यांच्या पक्षाची अपेक्षा वाढली आहे. त्यातच त्यांच्या मागणी इतक्या जागा देण्यास भाजपाचा नकार असल्याने दादांच्या राष्ट्रवादीने स्वबळाची तयारी केली असून तशा हालचाली सुरू केल्या आहेत.
सध्यस्थितीतमहायुतीतून अजितदादांची राष्ट्रवादी बाहेर पहण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून भाजपा, शिंदे सेना आणि जनसुराज्यसह इतर पक्षांांची युती होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आघाडीच्या नेत्यांनी मनपासाठी आघाडी करण्याची घोषणा केली असली तरी त्यांचाही अंतिम निर्णय झाला नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही जादा जागांची मागणी केल्या आहेत, काँग्रेसने जादा जागा देण्यास विरोध केला आहे. त्यामुळे हा तिढा सुटलेला नाही. सध्या महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजुच्या पक्षांमध्ये जागा वाटपात घोडं अडली असुन अर्ज माघारीपर्यंत हा तिढा सुटण्याची शक्यता कमी दिसत आहे.