Sangli महापालिकेत जल्लोष, 630 मानधन कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा कोर्टाचा निर्णय
महापालिकेसमोर गुलालाची उधळण करत जल्लोष आणि आनंदोत्सव साजरा
सांगली : सांगली महापालिकेच्यावतीने आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. महापालिकेतील 630 मानधन कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय औद्योगिक न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, या निकालानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर गुलालाची उधळण करत जल्लोष आणि आनंदोत्सव साजरा केला.
२०१६ मध्ये महापालिका कामगार युनियनकडून दाखल केलेल्या दाव्यावर औद्योगिक न्यायालयाने हा निकाल दिला आहे. त्यामुळे या निकालाबाबत लवकरच आयुक्तांची भेट घेऊन अंमलबजावणी करण्याची विनंती करणार असल्याचे विजय तांबडे यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी कामगार एकजुटीचा विजय असो, विजय तांबडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना तांबडे म्हणाले, आजचा निकाल हा ऐतिहासिक आहे. कारण महापालिकेमध्ये कंत्राटीकरण पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश आले आहे. पहिल्यांदा रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पर्मनंट ऑरर्डसाठी लढा सुरु होता. बदलीवाल्यांचाही लढा सुरू आहे. तसेच मानधनववर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पर्मनंट ऑरर्डसाठी केसेस कोर्टामध्ये दाखल केल्या आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे आता सकारात्म वातावरण तयार झाले आहे.
याप्रकरणी 2016 साली केस दाखल केली होती. काल सायंकाळी डिक्टेशन पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निकाल जाहीर केला आहे. ज्या दिवशी केस दाखल केली त्यादिवसापासून सदर कर्मचाऱ्यांना पर्मनन्सी दिली आहे. त्यामुळे जेव्हापासून निकाल लागला तेव्हापासूनचे सर्व फायदे कर्मचाऱ्यांना देण्यात यावे, असं कोर्टाने निकालात सांगितलं आहे. पुढे तांबडे म्हणाले, अजून बदली कर्मचाऱ्यांचा लढा आहे. त्यांची ऑर्डर देखील डिक्टेट झाली आहे. या कर्मचाऱ्यांचा दावाही दाखल केला आहे. त्यामुळे आता त्यांच्यासाठीही कायदेशीर लढाई लढणार असल्याचे तांबडे यांनी स्पष्ट केले आहे.