जत पूर्वभागात पुन्हा गूढ आवाज, जनतेत धास्ती ! जमीनीची थरथर
घरांवरील पत्रे, खिडक्यांची तावदाने हादरले
सोन्याळ वार्ताहर
जत तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांत सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास गूढ आवाज झाला. आवाजाची तीव्रता अधिक असल्याने काही सेकंद जमीन थरथरली. काही गावातील घरांवरील पत्रे, खिडक्यांची तावदाने हादरल्याने नागरिकांत काही काळ भीतीचे वातावरण होते. या भागात मागील तीन महिन्यापासुन पासून सातत्याने गूढ आवाज होण्याची मालिका सुरू आहे. मागील मा†हन्यात असाच गूढ आवाज झाला होता. त्यातच सोमवारी पुन्हा स्फोट झाल्यासारखा जमिनीतून गूढ आवाज आला. प्राथमिक माहितीनुसार जत तालुक्याच्या पूर्व भागात आकाशातून अगर जमीनीच्या भूगर्भातून सकाळी भयानक मोठा आवाज आला.
उमदी, संख, उटगी, करजगी, सोन्याळ, जाडरबोबलाद, माडग्याळ, बोर्गी परिसरासह कर्नाटकातील विजापूर जिल्हयातील चडचण पर्यंतची गावे गूढ आवाजाने हादरली आहेत.या भागात असे प्रकार अधूममधून घडत असल्याने जनतेत धास्तीचे वातावरण आहे. या गूढ आवाजाने लोकांना भूकंपाची आठवण झाली. जून मा†हन्यात अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांच्यासह वरिष्ठ भुगर्भ शास्त्रज्ञ आाणि जिल्हा प्रशासनातील आ†धकाऱ्यांनी उटगी, उमदी, बालगाव, बोर्गी आदी गावात पाहणी करत नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले होते.
नैसर्गिक इतिहास नसल्याने घाबरण्याचे कारण नाही : मागाडे
संखचे अतिरिक्त तहसीलदार सुधाकर मागाडे यांच्याशी या घटनेबाबत संपर्क साधला. याबाबत त्यांना विचारले असता या भागात भूकंप किंवा तत्सम नैसर्गिक घटनांचा इतिहास नाही. याकारणाने जनतेने घाबरण्याचे कारण नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधून गूढ आवाजाची मा†हती कळवली आहे असे सांगित ले.