For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कृष्णा- वारणेला संथगतीने उतार ! आज पातळी दीड फुटापर्यंत वाढणार

04:19 PM Jul 31, 2024 IST | Abhijeet Khandekar
कृष्णा  वारणेला संथगतीने उतार   आज पातळी दीड फुटापर्यंत वाढणार
Sangli Flood Krishna- Varana
Advertisement

अलमट्टीचा विसर्ग पुन्हा साडेतीन लाख क्युसेक; कोयनेसह कृष्णा खोऱ्यातील धरणातून विसर्ग वाढविला

सांगली प्रतिनिधी

धरणांचे पाणलोट क्षेत्र आणि मुक्त क्षेत्रात पावसाने उघडीप दिली असली तरी धरणांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे कृष्णा आणि वारणा नदीची पातळी संथ गतीने उतरू लागली आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी मंगळवारी एक फुटाने उतरत 38.6 फुटावर स्थिर होती. अलमट्टी धरणातील विसर्ग तीन लाखांवरून साडेतीन लाख क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे.

Advertisement

सध्या पावसाने उघडीप दिली आहे. परंतू हवामान विभागाने सातारा जिल्हयाला पुन्हा ऑरेंज अॅलर्ट दिला आहे. त्याचबरोबर जोरदार पावसामुळे धरण आणि नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सूरू आहे. त्यामुळे कोयना, वारणा, धोम, कण्हेरी, धरणांतून विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीची पातळी संथगतीने कमी होऊ लागली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत आयर्विन पुलाजवळ एक फुटाने पातळी कमी झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंत आणखी अर्धा फुटापर्यंत पातळी घसरेल. परंतू त्यानंतर दिवसभरात एक ते दीड फुटाने पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. कृष्णा कोयना धरणातील विसर्ग 32 हजार क्युसेकवरून 42 हजारपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर धोम, कण्हेर, तारळी धरणातून एकत्रित दहा हजार क्युसेकपर्यंत विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी अकरा वाजल्यापासून कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

अलमट्टी 32 टीएमसी कमी केले आज पुन्हा साडेतीन लाख क्युसेक विसर्ग
सांगली-कोल्हापूर जिह्यातील महापुरावर अलमट्टी धरणातील पाणीसाठा परिणाम करतो. त्यामुळे प्रत्येकवर्षी पश्चिम महाराष्ट्राचे अलमट्टीच्या साठ्याकडे लक्ष असते. परंतू यावेळी सांगली जलसंपदा आणि अलमट्टी धरण प्रशासन यांचा उत्तम सुसंवाद झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जुलै महिन्यात अलमट्टी धरणातील विसर्ग साडेतीन लाख क्युसेक करण्याची घटना प्रथमच घडली आहे. सध्या या धरणातील पाणीसाठा शंभर टीएमसीपासून 67.86 टीएमसीपर्यंत कमी करण्यात आला आहे. तर मंगळवारी रात्री आठ वाजल्यापासून साडेतीन लाख क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.

Advertisement

पंधरा ऑगस्टपर्यंत सतर्कता आवश्यक
दरम्यान, सध्या पावसाच्या उघडीपीमुळे पाणीपातळी संथ गतीने उतरू लागली आहे. महापुराचा धोकाही टळला आहे. तरीही पंधरा ऑगस्टपर्यंत पावसाचे दिवस असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. स्थलांतर झालेल्या नागरिकांनी घरी परतण्याची घाई करू नये, असे आवाहन पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.