कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सांगली ड्रग्जचा बॉलिवूडमध्ये हैदोस !

06:25 AM Dec 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गुन्हेगार संपविणे सोपे, मात्र गुन्हेगारी संपविणे प्रचंड अवघड. 1990 च्या दशकातील अंडरवर्ल्ड संपविण्यासाठी प्रत्येकजण सिंघम बनला. खुलेआम एन्काउंटर करीत गुन्हेगार नावाची माणसे मारली. मात्र गुन्हेगारी काही संपवू शकले नाही. त्याच गुन्हेगारीचे एक उग्रऊप म्हणजे अमली पदार्थाचा विळखा. हा विळखा शहरी तसेच ग्रामीण भागाला पडला असून, त्याच ग्रामीण भागातील सांगली जिह्यात  जप्त केलेल्या ड्रग्जने बॉलिवूडमध्ये हैदोस घातला आहे.

Advertisement

अमली पदार्थाच्या विळख्याने संपूर्ण देश पोखरला आहे. मुंबईसह राज्यात अमली पदार्थाचे खुलेआम कारखाने सुऊ आहेत. तर या कारखान्यात बनलेल्या ड्रग्जने संपूर्ण राज्यात धुमाकूळ घालण्यास सुऊवात केली आहे. सध्या पोलीस दलातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी आम्ही मुंबई शहरातील गुन्हेगार कसे संपविले? बॉम्बस्फोटाचा तपास कसा केला? अशी स्वत:ची टिमकी वाजविण्यासाठी पुस्तकांचा आधार घेण्यास सुऊवात केली आहे. स्वत: पुस्तके लिहीत आम्ही गुन्हेगार आणि गुन्हेगारी कशी संपविली अशी मिजासखोरी पुस्तकाच्या ऊपाने मांडण्यास सुऊवात केली आहे. यासाठी काही मोजक्या जणांना आमंत्रित करीत त्यांच्यासमोर आपण केलेल्या कारनाम्याचे पुस्तकऊपी विमोचन करण्याचा सपाटा सुऊ केला आहे.

Advertisement

एकवेळ तुम्ही गुन्हेगार संपवाल मात्र गुन्हेगारी प्रवृत्ती नाही. बरे तुमच्या काळात अंडरवर्ल्ड चरमसिमावर होता त्यावेळेस काय फक्त टोळीयुद्धच सुऊ होते का? त्यावेळेस ड्रग्ज तस्करी सुऊ नव्हती का? आत्तापर्यंत एकाही निवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्याने किंवा एन्काउंटर स्पेशालिस्टने दाउदच्या ड्रग्ज साम्राज्याला तडा दिला नाही. याचा परिपाक इकबाल मिर्ची या दाऊदचा ड्रग्ज हॅण्डलरने इंग्लंडमध्ये राहून संपूर्ण जगात दाऊदचे साम्राज्य वाढविले. त्याच ड्रग्ज साम्राज्यावर दाऊद पाकिस्तानची अर्थवाहिनी बनला आहे. जर हेच या अधिकाऱ्यानी दाऊदचे ड्रग्ज साम्राज्य उद्धवस्त केले असते तर आत्ता जो अमली पदार्थाचा सुळसुळाट सुऊ आहे, त्याला तरी आळा बसला असता. पण नाही जो तो पोलीस दलातील सिंघम बनण्याचा प्रयत्न करीत होता.

अशावेळी प्रत्येक गँगस्टराकडे आपले इमान काही प्रमाणात गहाण ठेवले होते. नेमके याचमुळे अमली पदार्थाच्या तस्करीकडे दुर्लक्ष झाले. सध्या अमली पदार्थाचा अजगरी विळखा शहरी आणि ग्रामीण भागात जोरदार बसू लागला आहे. सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ड्रग्जच्या कारखान्याने तर

बॉलिवूडमध्ये हैदोस घातला आहे.

मुंबई पोलिसांनी सांगली येथील ड्रग्ज कारखान्यामध्ये गेल्या वर्षी जप्त करण्यात आलेल्या 256 कोटी ऊपयांच्या ड्रग्जचे बॉलिवूड कनेक्शन असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गेल्या महिन्यात दुबईतून  प्रत्यार्पित करण्यात आलेला ड्रग्ज माफिया सलीम शेखच्या चौकशीतून अनेक मोठे आणि धक्कादायक खुलासे उघड झाले आहेत. सलीम शेखने अनेक

बॉलिवूड कलाकारांना ड्रग्ज पुरवल्याचा दावा केला आहे. गंभीर बाब म्हणजे या नावांमध्ये बॉलिवूडच्या सिद्धार्थ कपूर, श्रेया कपूर, ओरी यांची नावे समोर आली आहेत. विशेष पथक स्थापन कऊन याचा तपास सुऊ केला असता पोलिसांनी आत्तापर्यंत सिद्धार्थ कपूर आणि ओरी यांचा जबाब नोंदविला आहे. तर काही सेलिब्रेटीजना लवकरच बोलविण्याची तयारी सुऊ केली आहे. 200 कोटी ऊपयांच्या मनी

लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या तिहार तुऊंगात कैदेत असलेल्या आरोपी सुकेश चंद्रशेखर प्रकरणात ईडीने चौकशी केली होती. या प्रकरणातील एका अभिनेत्रीचे नावही सलीम शेखने घेतले आहे.

तसेच, सर्वात महत्त्वाचे आणि धक्कादायक म्हणजे, मुंबईतील एका दिवंगत मोठ्या नेत्याच्या मुलाचे नावही त्याने चौकशीच्या दरम्यान घेतले आहे. याचसोबत जुन्या काळात सुपरहिट चित्रपट बनवलेल्या बॉलिवूडमधील एका सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचे नावही या ड्रग्ज माफियाने पोलिसांना सांगितले आहे. एवढेच नाही तर, दाऊदच्या एका जवळच्या नातेवाईकाचा देखील या नेटवर्कमध्ये सहभाग असल्याचे त्याने सांगितले आहे. सांगली जिह्यातील कारखान्यात तयार झालेल्या ड्रग्जने केवळ बॉलिवूडच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मजल मारली आहे. बॉलिवूड आणि ड्रग्ज हे काही नवीन नाही. यापूर्वी देखील शाहऊख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड आणि ड्रग्ज यांचे कनेक्शन समोर आले होते.

अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर केवळ बॉलिवूडच नाही, तर देशही हादरून गेला होता. एखादा सेलिब्रिटी किंवा बॉलिवूडचा नायक हा अमली पदार्थांच्या आहारी जाणे किंवा सेवन करणे, ही बाब नवीन नाही. संजय दत्त, फरदिन खान, प्रतीक बब्बर यासारख्या नायकांपासून ते ममता कुलकर्णी, पूजा भट्ट, दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंह आदी नायिकांचीही नावे या जीवघेण्या व्यसनाशी जोडलेली दिसून आली आहेत. बॉलिवूड आणि अमली पदार्थ यांचे कनेक्शन गेल्या चार दशकांपासून राहिलेले आहे. बॉलिवूडमधील नामांकित सेलिब्रिटी अमली पदार्थांच्या मगरमिठीत अडकल्याचे दिसून आले आहे.

बॉलिवूडची नवीन पिढीदेखील या जाळ्यात अडकली आहे. सुशांत सिंह राजपूतचा मफत्यू झाल्यानंतर बॉलिवूडचा काळा चेहरा पुन्हा एकदा समोर आला. एवढेच नाही, तर अंडरवर्ल्ड

डॉन, माफियांनी बॉलिवूडमधील मातब्बरांना हाताशी धरून अमली पदार्थांचा व्यवसाय सुरू ठेवल्याचे आढळून आले आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तचे करिअर सुऊवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहे. अमली पदार्थांचे सेवन करण्याची सवय त्याने मोकळेपणाने कबूल केली होती. एका कार्यक्रमात त्याने कॉलेजमध्येच आपल्याला अमली पदार्थ घेण्याची सवय लागल्याचे म्हटले आहे. तो म्हणतो, मला कोणी तरी सांगितले की, एकदा ट्राय कर; मग सुरू केले आणि ती सवय नऊ वर्षांपर्यंत राहिली. बराच काळ पुनर्वसन पेंद्रात घालवल्यानंतर आज संजय दत्त अमली पदार्थांपासून चार हात लांब आहे. तर 1990 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री म्हणून ममता कुलकर्णीची ओळख होती. चित्रपटांतून प्रसिद्धी मिळवल्यानंतर तिचे नाव 2018 रोजी अचानक प्रकाशझोतात आले आणि क्षणात तिची प्रसिद्धी लयाला गेली. जून 2018 रोजी पोलिस ठाण्यात ड्रग्ज रॅकेटप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि यात ममता कुलकर्णीचे नाव होते. पोलिसांनी छाप्यात 2 हजार कोटी ऊपयांचे अमली पदार्थ जप्त केले.

अर्थात, ममताने हे आरोप नाकारले. प्रसिद्ध अभिनेते फिरोज खानचे चिरंजीव फरदिन खान याने खूपच कमी काळ चित्रपटात काम केले आहे. अभिनयाऐवजी त्याच्या ड्रग्ज कनेक्शनचीच चर्चा अधिक झाली आहे. त्याला अमली पदार्थ सेवन करण्याची सवय होती. याप्रकरणी 5 मे 2001 रोजी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली. अरमान कोहलीनेदेखील अमली पदार्थांवरून तुऊंगाची हवा खाल्ली आहे. ऑगस्ट महिन्यात अरमान कोहलीच्या घरावरही एनसीबीने छापा मारला होता. स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचे चिरंजीव प्रतीक बब्बर यानेही संजय दत्तप्रमाणेच अमली पदार्थांची सवय असल्याचे मान्य केले. वयाच्या 13 व्या वर्षीच अमली पदार्थांचे सेवन केल्याचे त्याने म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मफत्यूप्रकरणी एनसीबीला ड्रग्ज कनेक्शनचा शोध लागला. पोलीस तपासात अभिनेत्री रिया चक्रवर्ती कायदेशीर कारवाईत अडकली. तिला महिनाभर तुऊंगातही राहावे लागले आहे. सुशांतला अमली पदार्थ दिल्याचा रियावर आरोप आहे. तसेच ती ड्रग्ज सिंडिकेटचा भाग होती, असे म्हटले जाते. रियाच्या भावालाही अटक केली होती. सारा अली खानदेखील ड्रग्जच्या विळख्यात अडकलेली आहे. सुशांतच्या फार्महाऊसवर होणाऱ्या पार्टीत ती सामील होत असे. यात ड्रग्जचादेखील वापर केला जात होता. एनसीबीने चौकशी सुरू केल्यानंतर साराने ड्रग्ज घेतल्याचा इन्कार केला आहे. तर श्रद्धा कपूर पुन्हा एकदा ड्रग्ज प्रकरणामुळे प्रकाश झोतात आली आहे. अर्जुन रामपाल, रिंकु सिंग यासारखे कलाकार ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहेत. यामुळे सांगली ड्रग्जच्या विळख्यात आणखी कोणाची नावे समोर येतायत हे पोलीस तपासात पुढे येईलच. मात्र हे कोठे ना कोठे थांबले पाहिजे.

अमोल राऊत

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article