सांगली जिल्हा पुन्हा हादरला! अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा काढला काटा
अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले
कवठेमहांकाळ : अनैतिक संबंधास अडसर ठरत असणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा दाबून व काठीने मारहाण करून खून केल्याची घटना करोली (टी) येथे घडली असून आईच्या या दुष्कर्मास दोन मुलांनीही मदत करून मयताचा पुरावा नष्ट केला आहे. या खूनप्रकरणी चारजणांविरूध्द कवठेमहांकाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याच्या घटनेने कवठेमहांकाळ तालुका हादरून गेला आहे. दोनच दिवसापूर्वी सांगली येथे अशीच घटना घडली होती.
या घटनेची माहीती अशी की,करोली (टी) येथील मयत भारत इराप्पा कर्पे (वय ५८) यांची पत्नी निलाबाई हिचे गावातीलच बाबाजी गोविंद कर्पे याच्याबरोबर गेल्या काही वर्षापासून अनैतिक संबंध चालू होते. या संबंधाबाबत मयत भारत कर्पे यांना कुणकुण लागल्यानंतर त्यांनी पत्नी निलाबाई यांना समजावून सांगितले व वारंवार वादही होऊ लागला. त्यामुळे पत्नी निलाबाई यांनी प्रियकर बाबाजी कर्पे याच्या मदतीने पतीचा आपल्या मार्गातून कायमचाबाबाजी कर्षेअनिकेत कर्पेकाटा काढण्यासाठी कट रचला.
दि. २८ मार्च रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजता मयत भारत कर्प हे घरी आले असता घरी पत्नी निलाबाई आणि प्रियकर बाबाजी कर्पे हे एकत्रित असल्यामुळे मयत भारत यांनी पत्नीला व बाबाजी कर्पे याला जाब विचारल्यानंतर निलाबाई व बाबजीने काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे ते गंभीर जखमी झाले असताना आरोपींनी हाताने गळा दाबून भारतचा खूनकेला.
खून केल्यानंतर आरोपींनी हा खून लपविण्याचा प्रयत्न केला. भारतचा मृतदेह घरातील खिडकीला ठिबकच्या काळ्या पाईपच्या सहाय्याने टांगून गळफास घेतल्याचा बनाव करण्यात आला. त्यामुळे हा खून आत्महत्या असल्याचे भासविण्याचा प्रयत्न आरोपींनी केला.मनोज कर्पेयानंतर मयताची मुले आरोपी मनोज कर्पे व अनिकेत कर्पे यांनी मृतदेह कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात नेला. तेथे डॉक्टरांना दारू पिऊन वडिलांचा मृत्यू झाला अशी खोटी माहिती दिली. आपल्याच वडिलांचा खून लपविण्यासाठी खुनाची माहीती पोलिसांना न देता मृत्यू नैसर्गिकअसल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
त्यानंतर आरोपींनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता मृतदेहाचा तातडीने अंत्यविधी करून पुरावा नष्ट केला. मात्र मयत भारतच्या खूनाची कुजबुज गावात सुरू झाली. आणि भारतचा घातपात केल्याची चर्चाही सुरू झाली. आणि हे प्रकरण दबक्या आवाजात पोलिसांत पोहचले.एवढे करूनही काही घडलेच नाही अश्या आविर्भावात मयताची पत्नी निलाबाई, प्रियकर बाबाजी, मुले अनिकेत आणि मनोज वावरू लागले. मात्र पोलिसांनी संशयित म्हणून या चार जणांना ताब्यात घेतले व पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच हे चारहीआरोपी पोपटासारखे बोलू लागले आणि त्यांनी भारतच्या खूनाची कबुली दिली.
भारतच्या खूनाची माहिती उघडकीस आल्यानंतर करोली टी गावात मोठी खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंध, खून, आत्महत्येचा बनाव व पुरावा नष्ट करण्याचा प्रकार यामुळे नागरिकांमध्ये भीती व संताप व्यक्त केला जात आहे.
भारतच्या खून प्रकरणी पोलीस हवालदार रवि रामचंद्र गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरिक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत.