For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : सांगलीसह जिल्ह्यात मान्सूनपूर्वची जोरदार हजेरी

12:31 PM Jun 06, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
sangli news   सांगलीसह जिल्ह्यात मान्सूनपूर्वची जोरदार हजेरी
Advertisement

सांगली : शहर परिसरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी शुक्रवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसामुळे सांगलीतील सखल भागामध्ये पाणी साचून राहिले. तर मागील काही दिवसापासून प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या लोकांना पावसाने काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान यामुळे विविध ठिकाणी रात्री बीस पुरवठा खंडित झाला.

Advertisement

शुक्रवारी हवेत मोठा उष्मा जाणवत होता. दिवसभर लोक उकाड्यामुळे हैराण झाले होते. शुक्रवारी सायंकाळी ढगांचा गडगडाट सुरू झाला. जोरात वारे आणि आठच्या सुमारास सांगलीत पावसाला सुरुवात झाली. रात्री साडेआठ वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता. सांगलीसह माधवनगर, बुधगाव, कवलापूर, नांद्रे, बिसूर, बेडग, म्हैशाळ, तानंग मानमोडी सोनी, खोतवाडी, कांचनपूर, कुपवाड येथेही सुमारे अर्धा ते पाऊण पावसाने झोडपून काढले. सांगली शहरासह आटपाडी येथे बादळी वाऱ्यासह पाऊस झाला. चिंचणी ता तासगाव, माडगुळे ता. आटपाडी, कोळा ता. सांगोला येथेही जोरदार पाऊस झाला.

कवठेमंकाळ तालुक्यातील शिरढोण मळणगाव झुरेवाडीमध्ये मुसळधार पाऊस झाला. हिंगणगाव बु, डफळापूर कुंडल, मणेराजूरीसह सावळज, सिध्देवाडी, दहिवडी अंजनी वडगावसह परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळीने जोरदार हजेरी लावली. दिघंची येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याचे सांगण्यात आले. शिपूर ता. मिरज परिसरातही जोरदार पाऊस झाला आरग, नागाव कवठे, देशिंग येथे जोरदार पाऊस झाला. आष्टा शहरातही चांगला पाऊस आला.

Advertisement

प्रसाद वितरण कुपवाड परिसरासह गुंडेवाडी ता. मिरज, पायाप्पाची वाडी, बेळंकी, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, करोलीएम. येथे चांगला पाऊस झाला. धनगाव, भिलवडी येथे जोरदार पाऊस झाला. सोनी, भोसे, करोली परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.

सोनी, भोसे, करोली व परिसरामध्ये आज संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे अर्धा तासापेक्षा जास्त वेळ पडलेल्या या पावसामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कडक उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

Advertisement
Tags :

.