महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बायपास रस्त्यावर फ्लॅट फोडून दीड लाखांचा ऐवज लंपास

01:51 PM Jun 29, 2024 IST | Abhijeet Khandekar
Crime
Advertisement

सांगली प्रतिनिधी

येथील बायपास रस्त्यावरील अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट फोडून चोरट्याने एक लाख ऊपये रोख व सोन्याचे दा†गने असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत सुनंदा बाबासाहेब पाटील (रा. साई अपार्टमेंट, सांगली) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली.

Advertisement

सुनंदा पाटील या बायपास रस्त्यावरील साई अपार्टमेंटमध्ये राहतात. गुऊवारी त्या कर्नाटकात देवदर्शनासाठी गेल्या होत्या. फ्लॅट बंद असल्याचे पाहून चोरट्याने रात्रीच्या सुमारात कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील एक लाख ऊपये रोख व कानातील फुले, चांदी असा दीड ते पावणे दोन लाखाचा ऐवज लंपास केला. चोरट्याने शेजारच्या फ्लॅटला बाहेरून कडी लावली होती. तसेच घरातील देव्हाऱ्यातील देवाचे सोन्या-चांदीच्या दागिन्याला मात्र हात लावला नाही. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. माहितीतील व्यक्तीने चोरी केली असावी, असा पालिसांचा संशय आहे. सायंकाळी पाटील यांनी शहर पाोलसांत फिर्याद दिली.

Advertisement

Advertisement
Tags :
Sangli crime
Next Article