For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घरात घुसून चाकूच्या धाकाने सव्वा लाखांचे दागिने लांबविले

04:21 PM Jul 08, 2024 IST | Abhijeet Khandekar
घरात घुसून चाकूच्या धाकाने सव्वा लाखांचे दागिने लांबविले
Sangli crime breaking
Advertisement

दुधाळ शाळेजवळील घटना : संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल: तिघांचे कृत्य: पोलिसांकडून शोध सुरू

सांगली प्रतिनिधी

संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुधाळ शाळेजवळ राहणाऱ्या एका कुटुंबात तिघे अज्ञात चोरटे शिरले आणि त्यांनी या कुटुंबातील एकाच्या डोळ्यात चटणी टाकली आणि त्यानंतर गळ्याला चाकू लावून त्याच्या पत्नीचे सव्वा लाखांचे दागिने आणि मोबाईल जबरदस्तीने नेला आहे. याबाबत सौ. संगीता रामचंद्र ठोंबरे (रा. दत्त कॉलनी, राजास्वामी व्यायाम शाळेजवळ सांगली) यांनी अज्ञात तिघांविरूध्द फिर्याद दिली आहे.

Advertisement

शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता फिर्यादीच्या घरात तीन अनोळखी व्यक्ती शिरले आणि त्यातील एकाने फिर्यादीचे पती रामचंद्र ठोंबरे यांच्या डोळ्यात चटणी टाकली तर दुसऱ्याने फिर्यादीच्या पोटास चाकू लावून त्यांच्या गळ्यात असणारी सोन्याची बोरमाळ, कानातील कर्णफुले आणि मोबाईल असा एक लाख 13 हजाराचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला आहे. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या पतीने आरडा-ओरडा केल्याने बाजूचे लोक जमा झाले. त्यांनी या प्रकारानंतर या चोरट्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. तसेच याची माहिती संजयनगर पोलीस ठाण्यास दिली. संजयनगर पोलिसांनी याठिकाणी येवून पाहणी केली. तसेच या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची ही तपासणी केली आणि चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. संजयनगरचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी ही याठिकाणी येवून पाहणी केली. तसेच पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, भरवस्तीत हा प्रकार घडल्याने पोलीस ही चक्रावले आहेत. त्यांनी या परिसरातील नागरिकांकडे चौकशी सुरू केली आहे. तसेच हे चोरटे परप्रांतिय होते की, परिसरातील होते. याचाही शोध सुरू करण्यात आला आहे. तसेच इतक्या रात्री या घरातच ते कसे शिरले, याचाही शोध सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.