महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कुपवाडमध्ये खुनाचा प्रयत्न करणाऱ्या ९ जणांना अटक; ३ पिस्टल, ५ काडतुसे, 4 कोयते जप्त

05:00 PM Jul 20, 2024 IST | Abhijeet Khandekar
Sangli Crime arrested
Advertisement

कुपवाड पोलिसांची कारवाई

कुपवाड प्रतिनिधी

कुपवाडमधील राष्ट्रवादी ओबीसी सेलचे (अजित पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष सागर राजाराम माने (वय 35,रा. राजारामबापू हौसिंग सोसायटी, वाघमोडेनगर) यांच्यावर मयत दत्ता पाटोळे खून प्रकरणात त्याची पत्नी वनीता पाटोळे यांना न्यायालयीन कामात मदत करतो, याचा राग मनात धरून पिस्तूल रोखुन तसेच चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याचा प्रयत्न दहा दिवसांपूर्वी घडला.

Advertisement

याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी संशयित सर्व ९ जणांना अटक केली. तर एका अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले 3 देशी बनावटीचे पिस्तूल, 5 राऊंड, 4 कोयते, दोन दुचाकी असा एकूण 2 लाख 25 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक प्राणिल गिल्डा व सहाय्यक निरिक्षक दीपक भांडवलकर यांनी दिली. अटक केलेल्यांमध्ये संशयित संदेश रामचंद्र घागरे (वय 21, रा.वाघमोडेनगर), किरण दादासो कोडागिरे (वय 20, रा.वाघमोडेनगर), अनिकेत दत्ता कदम (वय 20, रा.वाघमोडेनगर), प्रतिक शिवाजी कोळेकर (वय 19, रा. शरदनगर), किरण शंकर लोखंडे (वय 23, रा. वाघमोडेनगर), सोनू ऊर्फ बापु हरी येडगे (वय 28, रा.बामनोली), सौरभ शहाजी मासाळ (वय 24, रा.वाघमोडेनगर), दादासो मारूती शेजुळ (वय 26, रा. दत्तनगर बामनोली) व मालिक सलिम शेख (वय 24, रा.दत्तनगर बामनोली) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात सागर माने यांनी फ़िर्याद दिली आहे. सर्व नऊजणांची शुक्रवारी न्यायालयिन कोठडीत रवानगी केली आहे.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, फ़िर्यादी सागर माने हे दत्ता पाटोळे खून प्रकरणात त्यांची पत्नी वनीता पाटोळे यांना न्यायालयीन कामात मदत करतो, याचा राग मनात धरून सर्व नऊजणांनी 8 जुलै रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान सागर मानेवर पिस्तूल रोखुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्या हल्यात खटका ओढला, पण पिस्तूलमधून गोळी फायर झाली न्हवती, त्यामुळे सागर माने बचावले. या घटनेनंतर सर्व संशयित फरार झाले होते. घटना घडताच कुपवाडचे सहाय्यक निरीक्षक दीपक भांडवलकर यांसह कर्मच्रायानी धाव घेतली. हलेखोरांच्या शोधासाठी पोलिसप्रमुख संदीप घुगे व अप्पर अधीक्षक रितु खोखर, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड पोलिस, एलसीबी, मिरज शहर व मिरज ग्रामीण पोलिसांची पथके रवाना झाली होती.

शुक्रवारी 12 जुलै रोजी सकाळी आष्टा बसस्थानक पा†रसरात संशयित येणार असल्याची खात्रीशीर माहिती हवालदार सचिन कनप यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित संदेश घागरे, किरण कांडिग्रे, अनिकेत कदम व प्रतिक कोळेकर यांना अटक करून एका अल्पवयीनला ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत आणखी काही हलेखोरांची नावे निष्पण्ण झाली. पोलिसांनी संशयित किरण लोखंडे व सोन्याबापू एडके या दोघांना अटक केली. या प्रकरणात आणखी तिघांचा समावेश असल्याचे पुढे आल्याने गुरूवारी मध्यरात्री मलिक शेख, दादासो शेजुळ, सौरभ मासाळ यांना अटक केली. एका अल्पवयीनला वगळता आजअखेर अटक केलेल्या संशयितांची संख्या नऊ झाली आहे. या कारवाईत संशयित संदेश घागरेकडून 1 देशी बनावटीचे पिस्तूल, किरण लोखंडेकडील 1 देशी बनावटीचे पिस्तूल व 2 जीवंत राऊंड, सौरभ मासाळकडून 1 पिस्तूल 3 जीवंत राऊंड, असे एकूण 3 पिस्तूल व 5 राऊंड व किरण कोंडीग्रे याची दुचाकी व त्याच्या जवळील 2 कोयते तसेच प्रतिक कोळेकर याची दुचाकी व त्याच्या जवळील 2 कोयते असे 4 कोयते असा एकूण 2 लाख 25 हजार 700 ऊपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा करीत आहेत.

Advertisement
Tags :
arrested attemptedKupwad 3 pistols seizedSangli crimetarun bharat news
Next Article