For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

जिल्हा भाजपमध्ये संशयकल्लोळ ! विद्यमान खासदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

12:13 PM Mar 09, 2024 IST | Abhijeet Khandekar
जिल्हा भाजपमध्ये संशयकल्लोळ   विद्यमान खासदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
Sangli Constituency BJP MP Sanjaykaka Patil

सांगली प्रतिनिधी

लोकसभा उमेदवारीवऊन जिल्हा भाजपमध्ये संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना तिकीटासाठी झगडावे लागत असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर युवा नेत्याच्या चर्चेने भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठी गोची झाली आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री दिल्लीत भाजप केंद्रिय समितीच्या बैठकित लोकसभेचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.

Advertisement

गेल्या दहा वर्षात सिंचन योजना, रेल्वे, महामार्ग, पायाभूत सुविधांसह लोकहिताची अनेक कामे कऊनही तिकीटासाठी झगडावे लागत असल्याने खासदार संजयकाका पाटील यांच्या समर्थकांमध्ये अस्थस्थता निर्माण झाली आहे. तिकीट संजयकाकांनाच मिळणारच असल्याचा दावाही ते करत आहेत. सर्व भाजप नेत्यांनी गुरूवारी पक्ष एकसंघ असल्याचे प्रदर्शन केले. मात्र अंतर्गत शहकाटशहाचे राजकारण सुऊच असल्याचे दिसून येत आहे. मात्र खासदार संजयकाका पाटील यांच्या कडून कार्यकर्त्यांनी आपण प्रचंड आशावादी आहोत. तिकीट आपल्यालाच मिळेल असा संदेश दिला जात आहे. दरम्यान तासगावमध्ये शुक्रवारी रात्री उशीरा अचानक फटाके वाजविण्यात आले. त्याचाही राजकीय संबंध जोडत हे फटाके तिकीट फायनल झाले म्हणून कोणी उडविले की अन्य कोणत्या कारणामुळे याची चर्चा सुरू होती. अगदी या फटाक्यांची दखल एरव्ही वाढदिवसाच्या फटाक्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांनीही घेऊन चौकशी चालवल्याचे दिसून आले.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.