Sangli Crime | सांगलीत साखळीचोरांचा भरदिवसा हैदोस! गणपती दर्शनासाठी निघालेल्या महिलेला फौजदार गल्लीत गाठले अन्...
सांगली : शहरातील फौजदार गल्लीपरिसरात भरदिवसा साखळीचोरांनी पुन्हा एकदा धाडसी कृत्य करत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. गणपती दर्शनासाठी घराबाहेर पडलेल्या एका महिलेच्या 1 गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून र आलेल्या दोन चोरट्यांनी क्षणार्धात न हिसकावून नेल्याची धक्कादायक ड घटना गुरुवारी सकाळी घडली.
खणभाग येथील पानाडे गल्ली व परिसरात राहणाऱ्या वैशाली आनंदा न केसरकर (वय ५०) या गुरुवारी . सकाळी हरीपूर येथील बागेतील 5 गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पायी न जात होत्या. सकाळी सव्वानऊच्या - सुमारास त्या फौजदार गल्लीतून 1 बसस्थानकाच्या दिशेने जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवर हेल्मेटधारी दोन तरुण त्यांच्या दिशेने आले. महिलेजवळ येताच मागे बसलेल्या न चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दीडतोळ्याची सोनसाखळी झटक्यात पकडली व जोरदार हिसका मारून तोडली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे केसरकर काही क्षण गोंधळून गेल्या. मात्र त्यांनी तात्काळ आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. काहींनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला, पण दोघेही दुचाकीवरून दिवेकर हॉस्पिटलच्या दिशेने वेगाने पसार झाले.
घटनेनंतर गळ्यातील साखळीचा काही भाग आणि बदामाच्याआकाराचे पेंडल रस्त्यावर पडलेले आढळले. मात्र सुमारे ५ ग्रॅम वजनाचा अंदाजे ३५ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा भाग चोरट्यांनी लंपास केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे बाताबरण निर्माण झाले असून भरदिवसा महिलांना लक्ष्य करणाऱ्या साखळीचोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.