For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News | सांगली जिल्ह्यात चलन टंचाई! आरबीआयच्या दारात बँकाधिकारी; पण उत्तर मिळेना!

12:38 PM May 06, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   सांगली जिल्ह्यात चलन टंचाई  आरबीआयच्या दारात बँकाधिकारी  पण उत्तर मिळेना
Advertisement

                                   सांगलीच्या बँकांमध्ये 'कॅश'चं गूढ!

Advertisement

सांगली : जिल्ह्यातील सहकारी, तसेच राष्ट्रीय कृत बँकांना सुमारेपाचशे कोटी इतके चलनाची गरज आहे, मात्र गेली दोन अडीच महिन्यांपासून बँकांना पुरेशा प्रमाणात चलनाचा पुरवठा होत नसल्याने बँकांची चलन मिळविण्यासाठी धावाधाव सुरू आहे,.जिल्हयाच्या मागणीच्या प्रमाणात चलन पुरवठा नसल्याने ग्राहकांना चलन देताना बँकांसमोर मोठी आर्थीक अडचण निर्माण झाली आहे.चलनासाठी आरबीआयसह इतर राष्ट्रीयकृत बँकांकडे जिल्हयातीलबँकांना हात पसरण्याची वेळ आली आहे, मात्र त्यांच्याकडूनही पुरेशा प्रमाणात चलन पुरवठा होत नसल्याचे सांगण्यात आले. मार्च अखेर आणि देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकीमुळे चलन पुरवठा कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता मार्च अखेर संपला असून पाच राज्यातील निवडणूकाही संपल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात चलन पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेला सर्वाधिक धावपळ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यात दोनशेवर शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून दिवसाल कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते, बँकेला महिन्याकाठी सुमारे तीनशेवर कोटी रूपये चलनाची गरज आहे. मात्र चलन टंचाईमुळे बँकेला गेली वोन महिने पुरेशा प्रमाणात चलन पुरवठा होत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. जिल्हयातील इतर सर्व बँकांच्या तुलनेत जिल्हा बँकेकडून ८० टक्के व्यवहार होतो त्यामुळे सध्याच्या चलन टंचाईचा फटका सर्वाधिक जिल्हा बँकेला झाला असून चलन मिळविण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.