For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News | चालत्या एसटीत घुसली दुचाकी बघ्यांच्या गर्दीत तरुण तडफडत राहिला !

12:00 PM May 06, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   चालत्या एसटीत घुसली दुचाकी बघ्यांच्या गर्दीत तरुण तडफडत राहिला
Advertisement

                     सांगलीत एसटी बसला दुचाकीची धडक

Advertisement

सांगली : सिव्हिल चौकातबुधवारी रात्री थरकाप उडवणारा अपघात घडला. स्टैंडकडे निघालेल्या चालत्या एसटी बसमध्ये समोरून येणारी दुचाकी थेट घुसल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की, तरुण थेट बसच्या पुढील काचेवर आदळून परत दुचाकीवर कोसळला. त्याच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिरज तालुक्यातील एक मजूर तरुण (दुचाकी क्रमांक एमएच १० बीजे ४९०१) वरून रात्री झुलेलालचौकातून सिव्हिलकडे येत होता. त्याचवेळी कोल्हापूर आगारची एसटी (एमएच १४ बीटी ४६१९) सांगली स्टैंडकडे जात होती. वाहतुकीमुळे एसटी चालकाने वेग कमी केलाअसताना, समोरून येणाऱ्या दुचाकी चालकाचा ताबा सुटला आणि तो थेट बसवर आदळला.

Advertisement

धडकेनंतर दुचाकी एसटीच्या पुढील भागात अडकली, तर जखमी तरुण काही काळ तसाच वाहनावर बसून तडफडत राहिला. मात्र मदतीपेक्षा अनेकांनी मोबाईल कॅमेरे सुरू केले. ही या घटनेची सर्वात संतापजनक बाजू ठरली. एसटी कर्मचारीही मदतीऐवजी व्हिडिओ शूटिंग करण्यात गुंतल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. शेवटी परिसरातील नारळ विक्रेते आणि काही पत्रकारांनी तरुणाला रिक्षातून तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तत्परतेमुळेच वेळेत उपचार मिळू शकले.

Advertisement
Tags :

.