For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांगेली कनिष्ठ महाविद्यालयाचा ८९.१० टक्के निकाल

04:58 PM May 02, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सांगेली कनिष्ठ महाविद्यालयाचा ८९ १० टक्के निकाल
Advertisement

विज्ञान शाखेत यज्ञेश सावंत तर कला + वाणिज्य शाखेत रुचिता तेली प्रथम

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी
सांगेली येथील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचा एच .एस .सी परीक्षेचा विज्ञान, संयुक्त कला + वाणिज्य या दोन्ही शाखेचा निकाल ८९.१० टक्के लागला आहे. या महाविद्यालयातून विज्ञान शाखा परीक्षेला बसलेल्या ७६ विद्यार्थ्यांपैकी ७५ विद्यार्थी उत्तीर्ण होत या शाखेचा निकाल ९८.६८ टक्के लागला. तर संयुक्त वाणिज्य व कला शाखा परीक्षेला बसलेल्या २५ पैकी १५ विद्यार्थी उत्तीर्ण होतं या शाखेचा निकाल ६० टक्के लागला. या दोन्ही शाखेतील एकूण १०१ विद्यार्थ्यांपैकी ९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात विशेष प्रावीण्य श्रेणीत १४, प्रथम श्रेणीत २२, द्वितीय श्रेणीत ४१ तर तृतीय श्रेणीत १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या महाविद्यालयाचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे विज्ञान विभाग- प्रथम यज्ञेश यशवंत सावंत ५३६ गुण ( ८९.३३ टक्के ),द्वितीय सौजन्या संजय घाटकर ५१८ गुण ( ८६.३३ टक्के ), तृतीय स्वरांगी सदानंद आंगचेकर ४९८ गुण ( ८३ टक्के ). संयुक्त कला + वाणिज्य विभाग प्रथम रुचिता संतोष तेली ३६० गुण (६० टक्के ), द्वितीय प्रणिता अजित कदम ३२० गुण (५३.३३ टक्के ), तृतीय दुर्वा संदीप सांगेलकर ३१४ गुण (५२.३३टक्के ).या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ पू राउळ, सचिव विश्वनाथ राउळ प्रशालेचे मुख्याध्यापक प्राचार्य रामचंद्र घावरे आणि शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.