For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नाट्यगृह आगीचा तपास, पुनर्बांधणीस विलंबावरून निषेध!

01:45 PM Sep 09, 2024 IST | Abhijeet Khandekar
नाट्यगृह आगीचा तपास  पुनर्बांधणीस विलंबावरून निषेध
Sangeetsurya Keshavrao Bhosle theater
Advertisement

कृती समितीची नाट्यागृहासमोर मेणबत्ती प्रज्वलित करून निदर्शने : मनपा, पोलिस प्रशासनाची महिनाभर यंत्रणा ठप्प असल्याचा आरोप

कोल्हापूर प्रतिनिधी
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहास आग लागून महिना झाला तरी महापालिका प्रशासनाकडून नाट्यगृहाचे पुणर्बांधणीस सुरूवात नाही. तसेच दोषींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडूनही तपास सुरू झालेला नाही. याचा निषेध म्हणून रविवारी केशवराव भोसले नाट्यागृह पुणर्बाधणी व संवर्धन कृती समितीने नाटयगृहासमोर मेणबत्ती पेटवून प्रशासनाचा निषेध केला.

Advertisement

कृती समितीचे अॅङ बाबा इंदूलकर म्हणाले, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहाला 8 ऑगस्ट रोजी रात्री आग लागली. या घटनेला एक महिने झाला तरी पोलिस प्रशासनाकडून आग लागली की कोणी लावली याचा तपास केलेला नाही. आग लागण्यास कारणीभूत ठरलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कोणतीच कारवाई मनपा स्तरावर झालेली नाही. निधीची घोषणा झाली परंतू पुढील कोणतीच प्रक्रिया झाली नाही. राजर्षी शाहू महाराज यांनी हे नाट्यागृह उभारले होते. या नाट्यागृहाची कोणी ओळख फुसण्याचा प्रयत्न करत असल्यास ते होऊ देणार नाही. प्रशासनाकडून तपास आणि पूणर्बांधणीसाठी केलेला विलंबाचा निषेध म्हणून मेणबत्ती प्रज्वलीत केल्या आहेत.
यावेळी ‘पूणर्बांधणीचे सोंग करणाऱ्या राज्य शासनाचा धिक्कार असो’, ‘घटनेच सत्य बाहेर पडलेच पाहिजे’, ‘नाट्यागृहाची पुणर्बांधणी झालीच पाहिजे’, ‘एक मेणबत्ती...नाट्यागृहासाठी’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी दिलीप देसाई, अॅङ बाबा इंदूलकर, माजी महापौर आर.के. पोवार, शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे, माजी नगरसेवक बाबा पार्टे, फिरोज सरगूर, रियाज कागदी आदी उपस्थित होते.

प्रत्येक महिन्यांच्या 8 तारखेला आंदोलन
जोपर्यंत आगी मागील सुत्रधार समोर येत नाही. नाट्यागृहाची पूणर्बांधणी होत नाही. तोपर्यंत कृती समिती दर महिन्यांच्या 8 तारखेला दरवेळी अभिनव पद्धतीने नाट्यागृहासमोर आंदोलन करणार असल्याचे दिलीप देसाई यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.