For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे छतकाम 20 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा

01:14 PM Nov 07, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur   संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे छतकाम 20 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा
Advertisement

                               प्रशासक मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीत ठेकेदारांना स्पष्ट सूचना

Advertisement

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या वरचा छताचे काम २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा, नाणी अशी सूचना प्रशासक के. मजूलक्ष्मी यांनी ठेकेदार श्रीनिवास सुलगे यांना गारा दिल्या. तसेच दुसऱ्या टप्प्यातील काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यच्या सूचना पूल ठेकेदार व्ही. के. पाटील यांना तर पुढील वारी टप्प्यातील कामे तत्काळ सुरु करुन मार्च सिध्द २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याची सूचना गोदरेज कंपनीच्या प्रतिनिधींना दिली.

मनपा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी वात गुरुवारी संगीतसूर्य केशवराव भोसले नवळ नाट्यगृह आणि राजर्षी शाहू खासबाग जिन कुस्ती मैदानाच्या नूतनीकरण, जतन, संवर्धन व पुनर्बाधणीच्या कामांचा बैठक घेत आढावा घेतला.

Advertisement

बैठकीनंतर प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मरकर, सहायक अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांढरे, व्यवस्थापक समीर महाब्री, सल्लागार प्रतिनिधी राजेश यादव, निरज अरूरकर, सुनिल पोवार, रंगकर्मी सुनिल घोरपडे, किरणसिंह चव्हाण, प्रसाद जमदग्नी यांच्यासमवेत कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ठेकेदाराला विविध सूचना केल्या.

Advertisement
Tags :

.