For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खेडेकरांसह चार गोमंतकीयांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार

11:53 AM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
खेडेकरांसह चार गोमंतकीयांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार
Advertisement

पणजी : संगीत नाटक अकादमीच्या चार पुरस्कारांचे मानकरी गोमंतकीय कलाकार ठरले आहेत. संगीत नाटक अकादमीने काल बुधवारी हे पुरस्कार जाहीर केले. लोकवेदाचे ज्येष्ठ अभ्यासक पद्मश्री विनायक खेडेकर यांना ‘अकादमी रत्न’ फेलोशिप पुरस्कार जाहीर झाला आहे. कांता गावडे यांना लोकसंगीतातील  ‘अकादमी पुरस्कार’ जाहीर झाला आहे, तर ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार’ महेश सतरकर (लोकनृत्य) आणि सिद्धी उपाध्ये (अभिनय) यांना घोषित झाला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते लवकरच हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. संगीत नाटक अकादमी अकादमी रत्न (फेलोशिप) हा सर्वोच्च पुरस्कार भारतातील एकूण सहा दिग्गज कालाकारांना घोषित करण्यात आला आहे. यात गोव्याच्या खेडेकर यांचा समावेश आहे. त्यांना पुरस्काराच्या ऊपात 3 लाख ऊपये रोख दिले जातील. 2023 सालासाठीचा पारंपरिक लोकनृत्य, लोकसंगीत, आदिवासी नृत्य आणि अभिनयामध्ये 11 जणांना पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये गोव्याचे सुप्रसिद्ध लोकसंगीतकार कांता गावडे यांची निवड झाली आहे. त्यांना पुरस्काराच्या ऊपात 1 लाख रोख प्रदान केले जातील. उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार 2022 साठी पारंपरिक कला प्रकारांत 11 जणांना पुरस्कार घोषित झाले आहेत. यात लोकनृत्यात गोव्यातील दिग्गज कलाकार महेश सतरकर यांना तर अभिनयात सिद्धी उपाध्ये यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. शाल, ताम्रपट आणि 25 हजार ऊपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.