महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संगीत मतीविलय‘प्रथम नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड

05:23 PM Dec 17, 2024 IST | Pooja Marathe
Sangeet Matavilay's first plays selected for the final round
Advertisement

कला क्षेत्रातून अभिनंदन

Advertisement

कोल्हापूर
संचालनालयातर्फे 63 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्या स्पर्धेची प्राथमिक फेरी कोल्हापूर केंद्रावर झाली. यामध्ये परिवर्तन कला फाऊंडेशनच्या ‘संगीत मतीविलय‘ या नाटकाला प्रथम क्रमांक मिळवला, तर निष्पाप कला निकेतनच्या ‘बाई मी दगड फोडते‘ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केली. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे.
गडहिंग्लज कला अकादमीचे ‘आणि कुंभाराचं काय झालं?‘ या नाटकास तृतीय पारितोषिक मिळाले आहे. अन्य पुरस्कार अनुक्रमे असे दिग्दर्शन सतीश तांदळे (संगीत मतीविलय), देविदास आमोणकार (बाई मी दगूड फोडते), प्रकाश योजना आशिष भागवत (तिचे संदर्भ नसलेली गोष्ट), कपिल मुळे (श्वेतवर्णी शामकर्णी), नेपथ्य: गायत्री कुंभार (म्याडम), ओंकार घोरपडे (रायगडाला जेव्हा जाग येते), रंगभूषा प्राण चौगुले (भाऊबंदकी), सुनीता वर्मा (तिचे संदर्भ नसलेली गोष्ट), उत्कृष्टअभिनय रौप्यपदक संतोष अबाळे (तिचे संदर्भ नसलेली गोष्ट), संपदा गावस (भाऊबंदकी). अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे साक्षी झिरंगे (मोक्षदाह), डॉ. यशोदा जाधव (पद्मश्री धुंडीराज), श्रुती धनवडे (चल थोडं अॅडजेस्ट करू), त्रिवेणी ठाकूर-देसाई (म्याडम), मानसी बोळुरे (श्वेतावर्णी शामकर्णी)), ओंकारनलावडे (रायगडला जेंव्हा जाग येते), सुशांत करोशे (अॅन एनिमी ऑफ द पिपल), दत्ता सुतार (आणि कुंभारचं काय झालं?), संभाजी कांबळे (गांधीनितीचे 21 दिवस), धनंजय पाटील (श्वेतवर्णी शामकर्णी)). राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन येथे जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत 19 नाट्याप्रयोग सादर करण्यात आले.

Advertisement

परीक्षक म्हणून अविनाश कोल्हे, प्रवीण शांताराम, पूर्वा खालगावकर यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी पारितोषिक प्राप्त संघांनी व कलाकारांनी भविष्यातही सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article