For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri News : नव्याने उभारलेल्या संगमेश्वर बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य 

11:41 AM Jun 01, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
ratnagiri news    नव्याने उभारलेल्या संगमेश्वर बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य 
Advertisement
संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत नव्याने उभारण्यात आलेल्या संगमेश्वर बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य पसरल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महामार्गाचे काम सुरू असल्याने पावसाच्या पाण्यासोबत वाहून आलेला चिखल बसस्थानक परिसरात साचला असून , संपूर्ण परिसर चिखलमय बनला आहे.
बसस्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना चिखलातून मार्ग काढावा लागत असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नव्याने उभारलेल्या बसस्थानकाची पहिल्याच पावसात दुरवस्था झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, महामार्गाच्या कामादरम्यान योग्य नियोजन आणि जलनिस्सारण व्यवस्थेचा अभाव असल्याने चिखल थेट बसस्थानक परिसरात वाहून येत आहे.
त्यामुळे बसस्थानकातील स्वच्छता आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, शनिवारी कोकण दौऱ्यावर आलेले परिवहन मंत्री सरनाईक यांनी संगमेश्वर बसस्थानकाला भेट दिली होती. यावेळी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी बसस्थानकातील विविध त्रुटी तसेच पाण्याची समस्या याबाबत लक्ष देण्याची मागणी केली.
,
Advertisement
Advertisement
Tags :

.