For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सँड्रा बुलक अन् निकोल किडमन पुन्हा एकत्र

06:47 AM May 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
सँड्रा बुलक अन् निकोल किडमन पुन्हा एकत्र
Advertisement

प्रॅक्टिकल मॅजिक 2 चा ट्रेलर प्रदर्शित

Advertisement

1998 मध्ये हॉलिवूड चित्रपट ‘प्रॅक्टिकल मॅजिक“ प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग 28 वर्षांनी प्रदर्शित होत आहे. याच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता वाढविली आहे. या ट्रेलरमध्ये व्हिक्टोरियन काळातील एक घर दाखविण्यात आले आहे, ज्यात सँड्रा बुलक साकारत असलेली व्यक्तिरेखा राहत असते.

प्रॅक्टिकल मॅजिक 2 चित्रपटात नवी पिढीही सामील झाली आहे. या चित्रपटात जोई किंग, मेसी विलियम्स दिसून येणार आहे. या नव्या कलाकारांच्या व्यक्तिरेखांमुळे ओवेन्स फॅमिलीच्या जीवनात अनेक बदल पहायला मिळणार आहेत. जोई किंग पुन्हा एकदा निकोलसोबत दिसून येणार असल्याने तिचे चाहते उत्सुक झाले आहेत.

Advertisement

प्रॅक्टिकल मॅजिक हा चित्रपट 11 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सँड्रा बुलक आणि निकोल किडमन या दोन दिग्गज अभिनेत्री एकत्र दिसून येणार असल्याने प्रेक्षकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. प्रॅक्टिकल मॅजिक हा चित्रपट खूप गाजला होता, यामुळे याच्या दुसऱ्या भागाकडूनही मोठ्या अपेक्षा ठेवल्या जात आहेत.

Advertisement
Tags :

.