For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sandip Singh Murder Case संदीप सिंग हत्येतील आरोपीचे एन्काउंटर 1 लाख रुपयांचे बक्षीस गुन्हेगार : ‘एसटीएफ’सोबत चकमक

08:42 PM Jun 27, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
sandip singh murder case संदीप सिंग हत्येतील आरोपीचे एन्काउंटर 1 लाख रुपयांचे बक्षीस गुन्हेगार   ‘एसटीएफ’सोबत चकमक
Advertisement

► वृत्तसंस्था
लखनौ
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये विशेष कृती दलाने (‘एसटीएफ’) एक मोठी चकमक घडवून आणली. ‘एसटीएफ’ने इंदिरा काना रोडवर झालेल्या चकमकीत 1 लाख रुपयांचे बक्षीस असलेला कुख्यात गुन्हेगार संजय उर्फ संजीव याला ठार केले. लखनौमधील एक प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक संदीप सिंग यांच्या हत्येतील तो मुख्य नेमबाज होता. 27 मे 2026 रोजी लखनौच्या पीजीआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत संदीप सिंग यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ‘एसटीएफ’सोबत झालेल्या चकमकीत संजयला गोळी लागल्यानंतर त्याला उपचारासाठी डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, संजय उर्फ संजीव हा आंबेडकर नगर जिह्याचा रहिवासी होता. तो अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये बऱ्याच काळापासून हवा होता. लखनौ पोलीस आयुक्तांनी त्याच्या अटकेसाठी 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. संदीप सिंग यांच्या हत्येनंतर, पोलीस तपासाने यामागील गूढ उलगडले. पोलीस तपासात असे समोर आले की, जुने वैर आणि जमिनीच्या वादातून हा गुन्हा घडला होता. संदीप सिंग यांच्या हत्येसाठी 5 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या हत्येमध्ये सामील असलेल्या अनेक आरोपींना आधीच अटक करण्यात आली आहे, तर मुख्य नेमबाज संजय अद्याप फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत असतानाच गोपनीय सूत्रांकडून त्याचा ठावठिकाणा समजल्यानंतर त्याला पकडण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली असतानाच ‘एसटीएफ’चा गुन्हेगाराशी जोरदार संघर्ष झाला. या चकमकीत संजयचा अंत झाला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.