For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तळवडे येथे आगीत नुकसान झालेल्या व्यावसायिकाला संदिप गावडे यांच्याकडून आर्थिक मदत

तळवडे येथे आगीत नुकसान झालेल्या व्यावसायिकाला संदिप गावडे यांच्याकडून आर्थिक मदत
Advertisement

न्हावेली /वार्ताहर : तळवडे येथील व्यावसायिक विजय कुंभार यांच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या संकटामुळे अडचणीत आलेल्या श्री. कुंभार यांना पुन्हा एकदा आपला व्यवसाय उभा करण्यासाठी तातडीच्या मदतीची गरज होती. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य संदीप गावडे यांच्या पुढाकारातून त्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी, तळवडे यांच्या माध्यमातून ही मदतीची रक्कम श्री. कुंभार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या मदतीमुळे कुंभार यांना पुन्हा आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी माजी सभापती पंकज पेडणेकर, शंकर सावंत, विकास गावडे, प्रेमानंद डिचोलकर, मधुसूदन तळवणेकर, दीपक कोरगावकर, सुशांत गावडे, सुभाष पेडणेकर यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.