कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कणकवलीत शहर विकास आघाडीतून संदेश पारकर निवडणूक लढविणार

05:56 PM Nov 15, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सर्व १७ ही जागांवर उमेदवार उभे करणार, राजकीय पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन

Advertisement

कणकवली / प्रतिनिधी

Advertisement

कणकवली नगरपंचायत मध्ये भाजप विरोधात कोण हे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष विरहित शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व जागा लढविण्यात येणार असल्याची घोषणा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी जाहीर केली.निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री पारकर म्हणाले भयमुक्त व भ्रष्टाचार मुक्त कणकवली करण्याच्या दृष्टीने ही परिवर्तनाची लढाई आहे. कणकवली शहरवासीयांची ही मागणी घेऊन मी अखेर भूमिका जाहीर करत आहे. शहर विकास आघाडीच्या माध्यमातून भयमुक्त व भ्रष्टाचार मुक्त कणकवलीकर हा आमचा नारा आहे कणकवलीकर आणि मोकळा श्वास घ्यावा व सत्तेचा आलेला माज उतरवावा या हेतूने आम्ही सर्व पक्षीयांना एकत्रित येण्याचे आवाहन करत आहोत. सध्याचे सत्ताधारी जणूकाही आपण कणकवली शहराची मालक असल्याप्रमाणे वागत आहेत. कणकवली म्हणजे मी, हा जो काही प्रकार सुरू आहे त्याच्या विरोधात कणकवलीकर एकजूट दाखवून ही लढाई आम्ही शहर विकास आघाडी म्हणून लढणार आहोत.गेल्या आठ वर्षाच्या कणकवली शहरांमध्ये 400 कोटी रुपयांचा निधी आला. मात्र त्यातून विकास कोणाचा झाला हा विकास दुर्बिणीने शोधण्याची वेळ आलेली आहे. म्हणूनच आम्ही सर्व राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून शहर विकास आघाडी स्थापन करून या निवडणुकीला सामोरे जात आहोत. सर्व जनतेने आमच्या पाठीशी ठामपणे राहावे असे आवाहन श्री पारकर यांनी केले.निवडणुकीचा ३ तारीखला येणारा निकाल हा कणकवली शहरात इतिहास घडवणारा असेल, असेही श्री पारकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarun bharat sindhudurg # kankavli #sandesh parkar#
Next Article