कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ठाकरे शिवसेना नवरात्र उत्सव समिती अध्यक्षपदी संदेश निकम

03:48 PM Sep 14, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Advertisement

वेंगुर्ले तालुका ठाकरे शिवसेनेच्या सार्वजनिक नवरात्र उत्सव समिती अध्यक्षपदी ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तसेच नवरात्र उत्सव समिती गठित करण्यात आली आहे.येथील ठाकरे शिवसेनेच्या तालुका मध्यवर्ती कार्यालयात तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांच्या उपस्थितीत सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करण्यासंदर्भात नवरात्रोत्सव समिती निवडीची बैठक पार पडली. यावेळी नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश निकम, उपाध्यक्षपदी उपतालुका प्रमुख संजय गावडे, सचिवपदी शैलेश परुळेकर, खजिनदारपदी अजित राऊळ, सहखजिनदारपदी गजानन गोलतकर तर सांस्कृतिक कमिटी प्रमुखपदी पंकज शिरसाट व वैभव फटजी यांची निवड करण्यात आली. समितीच्या सल्लागारपदी तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, माजी नगरसेवक तुषार सापळे, ठाकरे सेनेच्या सावंतवाडी विधानसभा महिला आघाडी प्रमुख सुकन्या नरसुले, कोमल सरमळकर, तालुका महिला आघाडी प्रमुख साक्षी चमणकर, उभादांडा सरपंच नीलेश चमणकर, सुहास मेस्त्री, कारमेलिन फर्नांडिस, जस्मिन फणसोपकर, राजश्री मर्ये, अपेक्षा बागायतकर, नम्रता कुर्ले, मिलाग्रीन फर्नांडिस, सुयोग चेंदवणकर व रेकस परेरा यांची निवड करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article