वरेरकर नाट्यासंघ सभागृहात संदेश भंडारे यांचे आज ‘आनंद वारी’ छायाचित्र प्रदर्शन
प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य ग्रंथालय, कलावकाश आणि मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 2 नोव्हेंबर रोजी संदेश भंडारे यांचे महाराष्ट्रातील वारी परंपरेतील ‘आनंद वारी’ छायाचित्र प्रदर्शन दुपारी 2.30 ते रात्री 8 पर्यंत के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरी, लोकमान्य ग्रंथालय, वरेरकर नाट्या संघ हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी शशिधर नरेंद्र यांचे विशेष व्याख्यान सकाळी 11.30 वाजता होणार आहे. पुण्याचे प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या अप्रतिम फोटोग्राफ्स बरोबरच त्यांचे वारीतील अनुभव घेता येणार आहेत. वारीतील जात-पात विरहित बंधुभाव, प्रेम, सलोखा आणि भक्ती यांचे अनुपम दर्शन या छायाचित्रांतून होणार आहे. त्यांच्या प्रत्येक फोटोमागे काही विचार, काही संकल्पना आहेत. छायाचित्र पाहताना सर्वजण तल्लीन तर होतातच, पण समृद्धही होतात. छायाचित्र प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. तरी सर्वांनी पुरेपूर लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.