For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उ.विभाग पोलीस महानिरीक्षकपदी संदीप पाटील यांची निवड

01:14 PM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
उ विभाग पोलीस महानिरीक्षकपदी संदीप पाटील यांची निवड
Advertisement

बेळगाव : बेळगाव उत्तर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकपदी आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांची नियुक्ती झाली आहे. राज्य सरकारने बुधवारी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक चेतनसिंग राठोड यांची बदली झाली आहे. यापूर्वी बेळगावच्या जिल्हा पोलीसप्रमुख पदावर संदीप पाटील यांनी उत्तमरित्या सेवा बजावली आहे. त्यांच्या कारकीर्दीत सुरू केलेल्या जनता दर्शन या उपक्रमामुळे अनेक शेतकरी, गरीब, मध्यमवर्गीयांच्या समस्या मार्गी लागल्या होत्या. अशी पार्श्वभूमी असणाऱ्या संदीप पाटील यांची आता उत्तर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकपदी वर्णी लागली आहे. या पदावरील चेतनसिंग राठोड यांची सीआयडी आर्थिक गुन्हेगारी विभागाच्या पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाली आहे. बेळगावात यापूर्वी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त म्हणून सेवा बजावलेले अनुपम अगरवाल यांची राज्य राखीव दलाच्या आयजीपीपदी नियुक्ती झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.