महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बीपीएस टेबलटेनिसमध्ये संदीप, मार्वांदो, जिझस, संज्योत अंतिम फेरीत

12:49 PM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगाव : येथील बीपीएस क्लबने आयोजित केलेल्या उल्हास ज्युवेलर्स बीपेएस राज्य मानांकन टेबलटेनिस स्पर्धेला कालपासून फातोर्डा येथील इनडोअरमध्ये सुरूवात झाली. स्पर्धेची सुरूवात वॅटरन्स व पॅरा टेबलटेनिस सामन्यांनी झाली. राज्य मानांकन टेबलटेनिस स्पर्धेला 18 जूनपासून सुरूवात होईल तर सर्व विभागातील अंतिम सामना 23 जून रोजी खेळविण्यात येतील. वॅटरन्स विभागातील दुहेरीतील अंतिम सामना संदीप डिमेलो व मार्वांदो मास्कारेन्हस आणि जिझस डिकॉस्ता व संज्योत संकल्प यांच्यात होईल. उपांत्य लढतीत संदीप डिमेलो व मार्वांदो मास्कारेन्हसने लॅस्ली नोरोन्हा व अँथनी मेंडीसचा 3-1 असा तर जिझस डिकॉस्ता व संज्योत संकल्पने सॅनफर्ड झेवियर व प्रवीण गाडचा 3-0 असा पराभव केला.

Advertisement

पॅरा विभागातील व्हिलचेअर गटात अंतिम लढत राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता लॉईड फर्नांडिस व मॉयसेस रॉड्रिग्ज यांच्यात होईल. लॉईडने स्टॅनी डिसोझाचा 3-0 तर मॉयसेस रॉड्रिग्जने विशांत नागवेकरचा 3-2 असा पराभव केला व अंतिम फेरी गाठली. पॅरा स्टँडींग विभागातील अंतिम लढत आलेक्स आल्बुकर्क व चेतन साळगावकर यांच्यात अंतिम लढत होईल. उपांत्य लढतीत आलेक्सने फ्लिव आंद्रादचा तर चेतनने गोपाळ नाईकचा पराभव केला. या स्पर्धेत 250 पॅडलर्सनी भाग घेतला आहे. बीपीएस क्लबने नेहमीच टेबलटेनिस खेळाला प्रोत्साहन दिले आहे, असे  गोवा टेबलटेनिस संघटनेचे उपाध्यक्ष उल्हास ज्युवेलर्सचे विक्रम वेर्लेकर म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article