संदीप मांद्रेकर, प्रसाद तेली लाचप्रकरणी निलंबित
वनखात्यात फाईल मंजुरीसाठी मागितली लाच
पणजी : वन खात्याकडे असलेली फाईल मंजूर कऊन देण्यासाठी म्हापसा येथील एका व्यवसायिकाकडे लाच मागणाऱ्या दोन वनरक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश खात्याने शुक्रवारी जारी केला. निलंबित केलेल्या वनरक्षकांमध्ये संदीप मांद्रेकर व प्रसाद तेली यांचा समावेश आहे. म्हापसा येथील व्यवसायिक प्रितेश देसाई यांच्याकडे या दोघा वनरक्षकांनी लाच मागितल्याचा आरोप आहे. देसाई यांनी त्यांच्याविरोधात वनखात्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेऊन दोघांनाही सेवेतून निलंबित केल्याची माहिती वन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी दिली. देसाई यांची एक फाईल वनखात्याअंतर्गत प्रलंबित आहे. सदर फाईल मंजूर करून देण्यासाठी वनरक्षक संदीप मांद्रेकर व प्रसाद तेली यांनी देसाई यांच्याकडे संपर्क साधला व ठराविक रक्कम लाच म्हणून देण्याची मागणी केली. देसाई यांनी या दोघांविरोधात लाच मागत असल्याची तक्रार वन खात्याकडे केल्यानंतर मांद्रेकर व तेली यांना निलंबित केले आहे. या दोघांची चौकशी केली जाईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले.