महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

संदीप कौरवर 10 वर्षांची बंदी

06:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

भारताची महिला पॉवरलिफ्टर संदीप कौर उत्तेजक चाचणी प्रकरणात दोषी आढळल्याने नाडाच्या उत्तेजक विरोधी शिस्तपालन समितीने कौरवर कारवाई करताना तिला 10 वर्षांच्या कालावधीसाठी या क्षेत्रातून निलंबित केले आहे. पंजाबची 31 वर्षीय संदीप कौरकडून दुसऱ्यांदा उत्तेजक सेवन केल्याचा गुन्हा झाला आहे. 2019 साली तिची पहिल्यांदा उत्तेजक द्रव चाचणी घेण्यात आली. त्यावेळी तिच्या मूत्रल नमुन्यामध्ये निर्बंध घालण्यात आलेले उत्तेजक द्रव्य आढळले होते. त्यानंतर गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये तिची या क्षेत्रात पुनरागमन झाले. तिच्याकडून झालेल्या पहिल्या उत्तेजक गुन्हा प्रकरणात चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती. उत्तराखंडमध्ये झालेल्या वरिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेत संदीप कौरने 69 किलो वजनगटात तिसरे स्थान मिळविले होते. या स्पर्धेनंतर संदीप कौरची पुन्हा उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती आणि त्यामध्ये ती पुन्हा दोषी आढळली. नाडाच्या उत्तेजक विरोधी शिस्तपालन समितीने कौरकडून वारंवार असे गुन्हे घडल्याने तिच्यावर कारवाई करताना 10 वर्षांची बंदी घातली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article