For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तळवडे जनता विद्यालयाला संदिप गावडेंकडून १४ टेबल्स भेट

04:01 PM Feb 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
तळवडे जनता विद्यालयाला संदिप गावडेंकडून १४ टेबल्स भेट
Advertisement

न्हावेली /वार्ताहर

Advertisement

ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासात सोयी सुविधांची कमतरता भासू नये या उदात्त हेतूने जिल्हा परिषद सदस्य संदिप गावडे यांच्या माध्यमातून तळवडे येथील जनता विद्यालयाला १४ टेबल भेट देण्यात आले आहेत.शाळेच्या गरजेचा विचार करुन करण्यात आलेल्या या मदतीमुळे विद्यार्थी आणि शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.शाळेत आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात हे टेबल प्रशालेला सुपूर्द करण्यात आले.यावेळी बोलताना संदिप गावडे यांनी शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले.शिक्षण हा समाजाचा सर्वात महत्वाचा पाया आहे.विद्येच्या या मंदिरात विद्यार्थ्याना आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे असते.त्यामुळेच हा छोटासा वाटा उचलला असून भविष्यातही शैक्षणिक क्षेत्रात जमेल तशी मदत करण्याचा माझा मानस आहे.असे त्यांनी यावेळी आश्वासित केले.याप्रसंगी जनता विद्यालय प्रशालेचे अध्यक्ष श्री पेडणेकर,माजी सभापती पंकज पेडणेकर,शक्तीकेंद्र प्रमुख दादा परब,भूषण पेडणेकर,सुशांत गावडे यांच्यासह विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.लोकप्रतिनिधी आणि समाजधुरीण जेव्हा अशा प्रकारे शाळेच्या पाठीशी उभे राहतात.तेव्हा ग्रामीण भागातील शिक्षण अधिक सक्षम होते अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Advertisement
Advertisement
Tags :

.