महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ब्याकुड येथील शेतामधून चंदनाच्या झाडांची चोरी

10:40 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : ब्याकुड (ता. रायबाग) येथील शेतवडीतील चंदनाची झाडे चोरण्यात आली आहेत. रविवारी ही घटना घडली असून जमीन मालकांनी वनविभागाकडे तक्रार केली आहे. चोरट्यांनी दोन झाडे चोरल्याचे उघडकीस आले आहे. ब्याकुड व बिरनाळच्या मध्ये रजनीकांत यादवाडे यांच्या शेतजमिनीत ही घटना घडली आहे. चोरट्यांनी चंदनाचे झाड तोडताना कुत्री भुंकल्यामुळे एक झाड तेथेच टाकून पलायन केले आहे. वनखात्याचे अधिकारी शानूर नदाफ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. रजनीकांत यांनी आपल्या शेतजमिनीत 50 चंदनाची झाडे लावली आहेत. यापैकी काही झाडांची वाढ झाली नाही. काही झाडे वाढली आहेत. यापूर्वीही दोनवेळा याच शेतातील चंदनाची झाडे पळविण्यात आली आहेत. 50 पैकी सध्या 20 झाडे शिल्लक आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून शेतवडीतील झाडेही आता धोक्यात आली आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article