Hupari Crime | दोन-तीन जणांना उडवलं तरी माझं कोणी वाकडं करू शकत नाही!" हुपरीत वाळू माफियांची तलाठ्याला थेट धमकी
हुपरीत बेकायदेशीर मुरूम उत्खननावर कारवाई;
हुपरी : हुपरी येथे बेकायदेशीररित्यामुरूम उत्खनन सुरु होते. यावेळी तलाठी विचारणा करत असताना आडवा आल्यास ठार मारेन अशी धमकी देत त्यांच्या अंगावर स्कॉ र्पिओ घालण्याचा प्रयत्न केला. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात २०४९ इथ्४०९६ क्रमांकाच्या डंपर वरील चालक, युवराज मुधाळे (राहणार होळकरनगर हुपरी), पांढऱ्या स्कॉ र्पिओवरील चालक या तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.हुपरी तळंदगेच्या रोडवर घोरपडे कॉ लनी जवळ बेकायदेशीर मुरूम उत्खनन करून वाहतूक करीत असल्याची माहिती महसूल वरिष्ठ अधिकारी, महसूल अधिकारी सुभाष पांडुरंग जाधव (तलाठी) यांना समजली.
त्यांनी त्या ठिकाणी जाऊन विचारपूस्मा केली. यावेळी त्यांना मुरूम उत्खनाच्या खाडाखोड केलेल्या पावत्या दाखविल्या. यावेळी कारवाई करीत असताना धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडील गौण खनिज वाहतूक परवाना असलेले पावती पुस्तक नंबर १४९१ मधील अनुक्रमांक ७४५०१, ७४५०२ या खाडाखोड केलेल्या पावत्या डंपर मालक युवराज मुधाळे याने दाखविल्या. युवराज मुधाळे यांनी अनोळखी साथीदारास स्कॉर्पिओ वाहनातून बोलावून घेतले.
स्कॉर्पिओ चालकानेताब्यातील स्कॉर्पिओ वाहन भरधाववेगाने घेवून येत अधिकारी व त्यांच्या सहकारी यांच्या अंगावर घालण्याचाप्रयत्न केला. तो अनोळखी साथीदार म्हणाला, मी दोन-तीन लोकांना उडवून ठार केले तरी कोण माझे वाकडे करीत नाही. अशी धमकी देत शासकीय कारवाईस अटकाव केला. सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी तलाठी सुभाष पांडुरंग जाधव यांनी या तिघांच्यावर हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाकेयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे करीत आहेत.