For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार भारतीय कंपन्यांवर निर्बंध

06:46 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
चार भारतीय कंपन्यांवर निर्बंध
Advertisement

इराणशी संबंध ठेवल्याने अमेरिकेचा निर्णय

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतस्थित चार कंपन्या आणि तीन व्यक्ती यांच्यावर अमेरिकेने कार्यवाही केली आहे. या कंपन्यांनी इराणशी आर्थिक संबंध ठेवल्याने त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली. या कंपन्यांनी आणि व्यक्तींनी इराणच्या तेल आणि पेट्रोकेमिकल्स व्यवहारांमध्ये सहभाग घेतला होता, असा आरोप आहे.

Advertisement

अमेरिकेने काही दिवसांपूर्वी इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादत असल्याची घोषणा केली आहे. इराणची आर्थिक क्षमता कमी व्हावी, हा या कार्यवाहीमागे उद्देश आहे. तसेच इतर देश इराणशी तेलाचे किंवा तेलउत्पादनांचे व्यवहार करत असल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला.

कोणत्या कंपन्यांवर कारवाई

पोर्टीज पार्टनर्स एलएलपी, सदाशिव ओव्हरसीज लिमिटेड, पी. पी. सॉफ्टटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रकृती इन्फ्रा इंपेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अशी या चार कंपन्यांची नावे असून इद्रिसमिया अश्रफमिया शेख, हरीष रामचंद्र रंगी आणि प्रशांत गर्ग अशी निर्बंध घालण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. अमेरिकेने इराणशी तेलव्यवहार केल्याच्या कारणास्तव जगभरातील 60 कंपन्या, व्यक्ती आणि नौका यांच्यावर आतापर्यंत अशी कारवाई केली आहे, अशी माहिती देण्यात आली.

भिन्न भिन्न आरोप

निर्बंध घालण्यात आलेल्या चारही कंपन्यांवर मुख्य आरोप इराणकडून तेल आणि तेलउत्पादने खरेदी केली असा आहे. याशिवाय प्रत्येक कंपनीवर स्वतंत्ररित्या काही आरोप करण्यात आले आहेत. या कंपन्यांनी इराणशी मोठ्या रकमांचे व्यवहार केले, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. या कंपन्यांना अमेरिकेकडून दंड केला जाऊ शकतो किंवा त्याना त्यांचातेल व्यापार बंद करण्यास भाग पाडले जाऊ शकते.

इराणवर वाढविला दबाव

अमेरिकेने आता इराणवर दबाव वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. इराणची आर्थिक कोंडी केल्यास त्या देशाची शस्त्रास्त्रे खरेदी करण्याची किंवा विकसित करण्याची क्षमता कमी होईल आणि नंतर कालांतराने ती पुरेशा प्रमाणात नष्ट होईल, असा अमेरिकेचा होरा आहे. मात्र, इराणने अमेरिकेशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला असून अमेरिकेच्या निर्बंधांचा इराणवर काहीही परिणाम होणार नाही. कारण इराणची अर्थव्यवस्था भक्कम आहे. अमेरिकेशी होत असलेले युद्ध कितीही लांबले, तरीही इराण शरण येणार नाही, असे प्रतिपादन इराणकडून करण्यात आले.

Advertisement
Tags :

.