For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सॅमसंगकडून एस 26 मालिकेतील 3 स्मार्टफोन लवकरच बाजारात

06:16 AM Jan 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
सॅमसंगकडून एस 26 मालिकेतील 3 स्मार्टफोन लवकरच बाजारात
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

वॉशिंग मशीनसह इतर उत्पादनांच्यासोबत मोबाईल फोन्सची निर्मिती करणाऱ्या सॅमसंगकडून येत्या काळामध्ये गॅलेक्सी एस 26, एस 26 प्लस आणि एस अल्ट्रा हे तीन स्मार्टफोन सादर केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही जरी माहिती असली तरी सॅमसंगने या संदर्भात अधिकृतरित्या काही सांगण्यास नकार दिला आहे.

कधी उपलब्ध होणार

Advertisement

पण मिळालेल्या माहितीनुसार सदरच्या नव्या तीन स्मार्टफोनची किंमत ही गॅलेक्सी एस 25 मालिकेच्या तुलनेमध्ये थोडी अधिक असेल असे म्हटले जात आहे. गॅलेक्सी एस 26 मालिकेअंतर्गत नवे स्मार्टफोन फेब्रुवारीमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात असून सदरच्या स्मार्टफोनची विक्री भारतामध्ये मात्र मार्चमध्ये सुरू केली जाऊ शकते. वर्षाच्या प्रारंभीच सॅमसंग प्रीमियम गटातील फोन सादर करणार असून एस 26 या नव्या मालिकेअंतर्गत साधारणपणे तीन स्मार्टफोन बाजारात ग्राहकांसाठी सादर केले जातील.

किती असणार किंमत

माहितीनुसार गॅलेक्सी एस 26 ची किंमत ही 80 हजार रुपये तर एस26 प्लसची किंमत 90000 च्या आसपास असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पुढचा स्मार्टफोन म्हणजे एस 26 अल्ट्रा याची किंमत साधारणपणे 1 लाख 20 हजार रुपयेपेक्षा अधिक असणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाचे...

?  हे तीन फोन्स -गॅलेक्सी एस 26, एस 26 प्लस, एस अल्ट्रा

?  किंमत किती असणार-  80 हजार रुपयांच्या पुढे

Advertisement
Tags :

.