सॅमसंग गॅलेक्सी एम35 स्मार्टफोन लाँच
07:00 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : दक्षिण कोरियातील इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीमधील दिग्गज कंपनी सॅमसंगने भारतीय बाजारात आपला 5-जी स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीकडून गॅलेक्सी एम35 5जी सादर करण्यात आला आहे. याला 8 जीबी रॅमसह दोन स्टोरेज पर्याय दिले आहेत. याची सुरुवातीची किंमत ही 16,999 रुपये आहे. स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच आकाराचा आयताकृती सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 6000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरीची सुविधा मिळणार आहे. एक पूर्ण चार्जवर 2 दिवसांपर्यत बॅकअप मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम35 च्या मागील पॅनेलवरील ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात एलईडी फ्लॅशलाइटसह 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. खरेदीदारांना हा स्मार्टफोन ई कॉमर्स वेबसाईट व अॅमेझॉनवरुन खरेदी करता येऊ शकतो.
Advertisement
Advertisement