सॅमसंग गॅलेक्सी एफ 70 इ लवकरच होणार लाँच
50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 6000 एमएएच बॅटरी मिळणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
सॅमसंग इंडिया 9 फेब्रुवारी रोजी भारतात एफ आवृत्तीमधील एक नवीन स्मार्टफोन, गॅलेक्सी एफ 70इ लाँच करणार आहे. कंपनीने गॅलेक्सी एफ 70इ चे फोटो आणि स्पेसिफिकेशन शेअर केले आहेत. नवीन गॅलेक्सी स्मार्टफोन 6000 एमएएच बॅटरी, 6.7-इंच एचडी डिस्प्ले आणि 50-मेगापिक्सेल मेन सेन्सरसह येईल. हा कमी बजेटचा स्मार्टफोन असेल, ज्याची किंमत 15,000 ते 18,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते.
डिझाइन: लेदर फिनिशसह प्रीमियम लूक असून नवीन सॅमसंग फोनचा मागील पॅनल लेदर फिनिशसह येईल, जो प्रीमियम आणि सॉफ्ट फील देईल. ही डिझाइन फिंगरप्रिंट्स आणि किरकोळ स्क्रॅचपासून देखील त्याचे संरक्षण करते. कंपनी ते लाइमलाइट ग्रीन आणि स्पॉटलाइट ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करेल. समोर, 6.7 इंचाचा मोठा क्रीन आहे, ज्यामध्ये पातळ बेझल आहेत. फोनमध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि आवश्यक बटणे आहेत.
डिस्प्ले : कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी एफ 70इ मध्ये 1600 ते 720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7 इंचाचा एचडी क्रीन दिला आहे. हा इन्फिनिटी ‘यू’ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे, जो एलसीडी पॅनेलवर बनवला आहे.
कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनेलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर असेल. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.