For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचा आयपीओचा विचार बारगळला

06:18 AM Dec 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचा आयपीओचा विचार बारगळला
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स यांचा भारतीय शेअरबाजारात आयपीओ आणण्याचा विचार बारगळला आहे. आपल्या उत्पादनांच्या विक्रीवर कंपनी येणाऱ्या काळात भर देणार आहे.

कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपल्या उत्पादनांमध्ये करण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. या सोबतच आपल्या उत्पादनांच्या विक्री-वाढीकडेही कंपनी खास करुन लक्ष पुरविणार आहे. द. कोरियाची ही कंपनी भारतामध्ये उत्पादन प्रक्रिया विस्तारासाठी प्रयत्न करणार आहे. कंपनीने मोबाईल फोन निर्मितीसह सुट्या भागांच्या खरेदीसाठी पीएलआय योजनेसाठी अर्ज केला आहे.

Advertisement

नोएडात मोठा कारखाना

सॅमसंगचा जगातला सर्वात मोठा स्मार्टफोन निर्मिती कारखाना नोएडामध्ये कार्यरत आहे. हा कारखाना मोबाईल फोनच्या निर्यातीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत आहे. सध्याला कंपनीचा भारतीय बाजारात आयपीओ आणण्याचा कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट केले आहे. ह्युंडाई मोटर इंडिया आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स या द. कोरियाई कंपन्यांनी भारतामध्ये आपले आयपीओ सादर केले आहेत. यांच्यासोबत सॅमसंगचाही आयपीओ येणार असे म्हटले जात होते. परंतु आता कंपनीने आयपीओ आणण्याचा विचार नसल्याचे

Advertisement
Tags :

.