For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सॅमसनला डच्चू

06:50 AM Jul 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सॅमसनला डच्चू
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

चालु महिन्याच्या अखेरीस भारताचा क्रिकेट संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून सलामीचा फलंदाज आणि यष्टीरक्षक संजू सॅमसनला डच्चू देण्यात आला आहे.

या मालिकेसाठी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. 15 सदस्यांचा भारतीय संघामध्ये पंजाबच्या प्रभसिमरन सिंगला संधी देण्यात आली असून अक्षर पटेलच्या जागी अष्टपैलु हर्ष दुबेला तसेच वॉशिंग्टन सुंदरच्या ऐवजी रिंगू सिंगला संघात स्थान मिळाले आहे. प्रिन्स यादव, मयांक यादव, यश ठाकुर आणि अशोक शर्मा यांच्यावर गोलंदाजीची भिस्त राहील.

Advertisement

भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), इशान किशन, शुभम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरूण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, यश ठाकुर, अशोक शर्मा, मयांक यादव आणि प्रभसिमरन सिंग.

या मालिकेतील सामने 23, 25, 26 जुलै रोजी हरारे मध्ये खेळविले जाणार आहे.

Advertisement
Tags :

.