For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सॅमसन, बुमराह यांचे नामांकन

06:05 AM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
सॅमसन  बुमराह यांचे नामांकन
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

आयसीसीच्या 2026 मार्च महिन्यातील सर्वोत्तम पुरूष क्रिकेटपटू मासिक पुरस्कारासाठी भारताच्या संजू सॅमसन तसेच जसप्रित बुमराह यांच्या नावाची शफारस करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे द. आफ्रिकेचा यष्टीरक्षक आणि फलदाज कॉनर इस्टरहुइझेनचा या शर्यतीमध्ये समावेश आहे.

आयसीसीच्या 2026 मध्ये झालेल्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सुरूवातीला घोषित करण्यात आलेल्या भारताच्या 11 जणांच्या संघामध्ये संजू सॅमसनचा समावेश नव्हता. पण त्यानंतर त्याला विंडीज विरुद्धच्या सुपर-8 फेरीतील सामन्यात बदली खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आणि हा सामना भारताला कोणत्याही परिस्थितीत जिंकणे जरुरीचे होते. या सामन्यात संजू सॅमसनने नाबाद 97 धावा जमवित आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. या विजयामुळे भारतीय संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकला. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात संजू सॅमसनने 89 धावांची खेळी करत आपल्या संघाला अंतिम फेरीत नेले. तर न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने   पुन्हा 89 धावांची खेळी करत आपल्या संघाला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धा जिंकून दिली. संजू सॅमसन या स्पर्धेत मालिकावीर ठरला. त्याने 137.50 धावांच्या सरासरीने तसेच 199.27 स्ट्राईकरेटने 275 धावा काढल्या. आयसीसीच्या या महत्त्वच्या स्पर्धेत त्याने पाठोपाठ सामनावीराचाही पुरस्कारही मिळविल्याने त्याने आयसीसीच्या पुरूषांच्या टी-20 फलंदाजांच्या मानांकनात पहिल्या 20 खेळाडूंत स्थान मिळविले.

Advertisement

आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने बाद फेरीतील टप्प्यात आपल्या दर्जेदार कामगिरीची झलक दाखविली. या संपूर्ण स्पर्धेत बुमराहची कामगिरी उल्लेखनीय झाली. विंडीजविरुद्धच्या सुपर-8 फेरीतील सामन्यात त्याने दोन गडी बाद केले. त्यामध्ये फॉर्ममध्ये असलेला विंडीजच्या हेटमायरचा समावेश होता.

इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात बुमराहने इंग्लंडच्या डावातील 16 व्या आणि 18 व्या षटकात किफायतशीर गोलंदाजी करताना अनुक्रमे 8 आणि 6 धावा दिल्या. या सामन्यात त्याने 4 षटकात 33 धावांच्या मोबदल्यात 1 गडी बाद केला. बुमराहच्या या कामगिरीमुळे इंग्लंड संघाला हा सामना 7 धावांनी गमवावा लागला. यॉर्कर बहाद्दर बुमराहने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात आपल्या 4 षटकांत केवळ 15 धावांच्या मोबदल्यात 4 गडी बाद केल्याने त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती.

द. आफ्रिका संघातील नवोदित यष्टीरक्षक आणि फलंदाज कॉनर इस्टरहुइझेन याने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत आपल्या पदार्पणातच पाच सामन्यांत 50 धावांच्या सरासरीने 200 धावा जमविल्या. इस्टरहुइझेनने टी-20 प्रकारातील आपल्या पदार्पणातील मालिकेत चांगली कामगिरी करताना चौथ्या सामन्यात नाबाद 45 धावा झळकविल्या. या मालिकेत इस्टरहुइझेनने केवळ सर्वाधिक धावा जमविल्या नाही तर पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात केवळ 33 चेंडूत 75 धावांची खेळी करत आपल्या संघाला ही मालिका 3-2 अशा फरकाने जिंकून दिली. या मालिकेत त्याने दोनवेळा सामनावीराचा बहुमान मिळविला.

Advertisement
Tags :

.