महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सम्राट संगीत सितारा स्पर्धा 23 पासून

12:24 PM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव येथून स्पर्धेला सुरुवात : गोव्यासह पाच केंद्रांवर प्राथमिक फेरी

Advertisement

फोंडा : गोव्यातील सम्राट संगीत सितारा  स्पर्धेची सुरुवात यंदा बेळगाव येथून होणार आहे.  स्वरमल्हार फाऊंडेशनच्या पं. रामभाऊ विजापुरे स्वरमंदिरात दि. 23 रोजी सकाळी 9 वा. स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सम्राट संगीत सितारा पर्व 18 चे अध्यक्ष प्रसादभाऊ प्रभुगावकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पर्धेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. यावेळी खजिनदार मयूर जल्मी बेळगाव केंद्रप्रमुख सारंग कुलकर्णी, अंगद देसाई व आकाश पंडित हे उपस्थित होते. बेळगाव केंद्रावरील स्पर्धेचे उद्घाटन नौसेना दलाचे निवृत्त सैनिक अण्णासाहेब निंगप्पा बुगडे यांच्याहस्ते होणार आहे. स्पर्धकांना या केंद्रावरील प्रवेश अर्ज ऑनलाईन दि. 20 जूनपर्यंत सादर करावे लागतील. अधिक माहितीसाठी सारंग कुलकर्णी (9845690906) यांच्याशी संपर्क साधावा.

Advertisement

एकूण पाच केंद्रावरून होणाऱ्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी स्पर्धकांची निवड होणार आहे. दि. 22 रोजी सावंतवाडी, दि. 23 रोजी बेळगाव, दि. 29 रोजी कोल्हापूर, दि. 30 रोजी लाटंबार्से व दि. 7 जुलै रोजी बोरी फोंडा येथे प्राथमिक फेरी होणार आहे. वय वर्षे 14 ते 30 या वयोगटातील शास्त्रीय गायन शिकणाऱ्या युवा युवतींसाठी ही स्पर्धा असून त्यात स्पर्धकांना राग, बंदिश, चीज, ठुमरी, ख्याल, छोटा ख्याल आदी प्रकार 12 मिनिटात सादर करावे लागतील. अंतिम फेरी दि. 28 जुलै रोजी सांखळी गोवा येथील रवींद्र भवनमध्ये होणार आहे. अंतिम फेरीसाठी महागुरु म्हणून प्रख्यात गायक अजित कडकडे हे उपस्थित राहणार आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यांतील स्पर्धक स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article