For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सम्मान कॅपिटलचा समभाग 12 टक्के वधारला

06:17 AM Mar 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
सम्मान कॅपिटलचा समभाग 12 टक्के वधारला
Advertisement

मुंबई :

Advertisement

सम्मान कॅपिटल (पूर्वीचे नाव इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स) च्या समभागांनी शेअरबाजारात बुधवारी मोठी तेजी घेतलेली दिसून आली. रिझर्व्ह बँकेने एका कंपनीला सम्मानमध्ये गुंतवणूकीला हिरवा कंदील दाखवल्याने समभाग तेजीवर स्वार होता. इंट्रा डे दरम्यान कंपनीचा समभाग 12 टक्के वाढत 155 रुपयांवर पोहचला होता. नंतर हा समभाग 147 च्या स्तरावर घसरला होता. याचदरम्यान निफ्टी-सेन्सेक्स मात्र 2 टक्के इतके वाढले होते. अबुधाबीतील इंटरनॅशनल होल्डींग कंपनीची सहाय्यक कंपनी एव्हेनीयर इन्वेस्टमेंट आरएससी यांना 66 टक्के हिस्सेदारी अधिग्रहणाला आरबीआयने मंजुरी दिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.