जय गणेश मूर्तिकार कारागीर संघटनेच्या अध्यक्षपदी समीर वर्दम
मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यात प्रथमच 'जय गणेश मूर्तिकार कारागीर संघटना ' अशी मूर्तिकारांची संघटना स्थापन झाली असून तीची कार्यकारिणीही निवडण्यात आली आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदी श्री. समीर यशवंत वर्दम यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी श्री. उमेश हडकर (हडी) व सचिवपदी श्री. संजय राधाकृष्ण केळूसकर (तारकर्ली) यांची निवड करण्यात आली. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष समीर वर्दम म्हणाले मूर्तीकारांची मालवण तालुक्यातील ही पहिली संघटना स्थापन झाली असून ही संघटना तालुक्यातील गणपती मुर्ती व्यवसाय जास्तीत जास्त प्रमाणात विस्तृत कसा होईल व आपल्याला आर्थिक सुबत्ता कशी येईल यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगून श्री वर्दम यांनी एकमेकांच्या सहकार्याने मदतीने व मार्केटींगने आपल्या मुर्ती व्यवसायाची व्याप्ती जिल्ह्याबाहेर संपूर्ण भारतभर व परदेशात कशी वाढवता येईल, व मूर्तिकार हा व्यवसाय बाराही महिने कसा चालू ठेवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आमच्या या उपक्रमासाठी व प्रयत्नांसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही संघटनेच्या वतीने श्री. वर्दम यांनी केले आहे.या संघटनेची उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - सहसचिव: श्री. सुशांत तायशेट्ये (मालवण), खजिनदार: श्री. नारायण गणपत लुडबे (मालवण, सहखजिनदार - श्री. हेमंत गुणाजी रामाडे, संघटक - राजा इम्ब्रापुरकर (मेढा), कार्यकारिणी सभासद - श्री. सुधीर पवार (श्रावण), आबा कोयंडे (कोळंब), हर्षद घाडी(मालडी -विरण), शरद गावडे (महान), बापूराव चव्हाण (आंगणेवाडी), पंढरीनाथ दत्ताराम नायणकर (मसुरे), रवींद्र साळकर (साळेल), संदीप गावडे (चौके), सुनील केळूसकर (देवबाग), सुधाकर चिंदरकर (वायरी), प्रकाश पवार (कुंभारमाठ), संदीप कोळगे (मालवण भरड), विलास भिवा देऊलकर (देऊळवाडा मालवण). सल्लागार- श्री. रतीलाल तारी (तारकर्ली), श्री. दिलीप शशिकांत वायंगणकर, श्री. तारक कांबळी यांची निवड करण्यात आली.