For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संभाजीराजें तुम्हीच कृतघ्न! पारगड, सामानगड संवर्धनासाठी किती निधी दिला- आम.राजेश पाटील यांचा सवाल

02:12 PM Apr 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
संभाजीराजें तुम्हीच कृतघ्न  पारगड  सामानगड संवर्धनासाठी किती निधी दिला  आम राजेश पाटील यांचा सवाल
MLA Rajesh Patil
Advertisement

नुल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरच्या राजघराण्याचा सन्मान करत संभाजीराजे छत्रपती यांना खासदारकीची संधी दिली.मान दिला. निधी दिला. पण तुम्ही कृतघ्नच निघालात. असा आरोप करत शासनाने तुम्हाला गडकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोट्यावधीचा निधी दिला. निदान जिल्हयातील चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील पारगड व सामानगडांच्या संवर्धनासाठी किती निधी दिला ? याचे उत्तर द्या. मगच विकासकामांवर बोला.असा सवाल आमदार राजेश पाटील यांनी केला.

Advertisement

गडहिंग्लज तालुक्यातील नुल हसुरचंपु बसर्गे मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरमुआण्णा पाटील होते.

उमेदवार प्रा.संजय मंडलिक म्हणाले, या निवडणुकीत विरोधक विकासाच्या मुद्यावर न बोलता हुकूमशाहीची भाषा बोलत आहेत. आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकासगंगा गावागावात पोहचवली. हिंदुत्व जपण्याचे काम केले. विरोधकाकडे विकासाचे व्हिजन नसल्याने भावनिकतेचा मुद्दा पुढे करीत आहे. चंदगड तालुक्याचा मंडलिक घराण्याशी वेगळाच ऋणानुबंध आहे. भविष्यात या विभागातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करून पाणी टंचाई संपवू.ठ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

विरोधकांच्या हुकूमशाही वृत्तीवर संजय मंडलिक यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत , ते आज गृहराज्यमंत्री नाहीत याचे भान विसरलेत आणि आज आम्ही सत्तेवर आहोत याची नोंद घ्यावी ,असा खरमरीत इशारा खासदार धनंजय महाडीक यांनी दिला.
यावेळी ना.हसन मुश्रीफ, भरमुआण्णा पाटील, शिवाजी पाटील ,संग्रामसिंह कुपेकर , संतोष पाटील, सरपंच भारती रायमाने,जयश्री तेली, अजित शिंदे यांनीही मनोगते व्यक्त केली.

यावेळी प्रकाश चव्हाण, हेमंत कोलेकर, सुरेश कुराडे, कल्लापा खोत, सरपंच भारती रायमाने, योगिता संघाज, संतोष तेली, सागर कुराडे, जि.प. सदस्य अनिता चौगले, जयश्री तेली, वसंतराव चौगले, विकास मोकाशी, प्रकाश पताडे ,सातगौडा जिनानावर,महादेव साखरे, चंद्रशेखर पाटील, एल.टी .नवलाज यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. स्वागत जयकुमार मुनोळी यांनी ,प्रास्ताविक जयसिंग चव्हाण यांनी केले .महाबळेश्वर चौगले यांनी आभार मानले.

Advertisement

.