For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

संभाजीराजे छत्रपतींची लोकसभा निवडणूकीतून माघार; 'स्वराज्य' राज्यात एकही जागा लढवणार नाही

04:58 PM Mar 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
संभाजीराजे छत्रपतींची लोकसभा निवडणूकीतून माघार   स्वराज्य  राज्यात एकही जागा लढवणार नाही

जर शाहू महाराज छत्रपती लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर माझा प्रश्नच येत नाही. जर माझ्या उमेदवारीसाठी मी 100 टक्के प्रचार केला असला तार शाहू महाराज छत्रपतींसाठी मी 110 टक्के प्रचार करणार असे जाहीर करून आपण लोकसभा निवडणुकीच्या शर्यतीमधून बाहेर पडत असल्याचे स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केलं आहे.

Advertisement

आज कोल्हापूरमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपण लोकसभा निवडणुक लढवणार नसल्याचे जाहीर करून शाहू महाराज लोकसभेच्या निवडणूकीला उभे राहत असले तर मी त्यांचा प्रचार करणार असे म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून लोकसभेच्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती तसेच शाहू महाराज छत्रपती यांची नावे चर्चेत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही याबाबत वेळोवेळी संकेत देऊन छत्रपती घराण्यामधील उमेदवारीबाबत दुजोरा दिला होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून थोरले महाराज अर्थात शाहू महाराज छत्रपती यांचे नाव आघाडीवर असून त्यांना महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी या लोकसभा निवडणूकांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, "लोकसभा निवडणुकीसाठी उभा राहायचं हे माझं निश्चित होतं. मात्र, आमचे वडील श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची इच्छा लोकसभा निवडणूक लढवण्याची असेल तर माझा प्रश्नच येत नाही." असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, "निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण होईपर्यंत आमचं काम थांबणार नाही. वडिलांसाठी कष्ट करण्यात आम्ही कुठंही कमी पडणार नाही. शाहू महाराज, मालोजीराजे (Malojiraje) आणि मी एकत्रितपणे या निवडणुकीत काम करणार आहोत. कोल्हापूर हे नेहमी वेगळी दिशा देणारं शहर आहे. त्यामुळे ही निवडणूक आमच्यासाठी महत्वाची असणार आहे." असे संभाजी राजे छत्रपती यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement

Advertisement
Tags :
×

.