मोकाट कुत्र्यांच्या पाठलागमध्ये सांबराचा मृत्यु! गगनबावड्यात घडली रविवारी रात्री घटना
कोल्हापूर प्रतिनिधी
गेल्या आठवड्यात पाच संशयीतांनी मादी जातीच्या सांबराची शिकार केल्याची घटना ताजी असताना, मोकाट कुत्र्यांनी सुऊ केलेल्या पाठलागमुळे भेदरलेल्या सांबराने, मोकाट कुत्र्यापासून जीव वाचविण्यासाठी तलावात उडी मारली. पण तलावाच्या पाण्यात बुडून सांबराचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास गगनबावडा तालुक्यात घडली असून, आठवड्याभरात दोन सांबरांचा मृत्यु झाल्याने, तालुक्यांतील वन्य प्राण्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
जिह्यात सवार्धिक पाऊस पडणारा प्रदेश म्हणजे गगनबावडा तालुका होय. तसेच या तालुक्याला वनसंपदेचे वरदान लाभल्याने, या तालुक्यात अनेक वन्य प्राण्यांचा अधिवास दिसून येतो आहे. या वनप्राण्याची कधी-कधी लोकांच्याकडून शिकार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. रविवारी सांयकाळी सात वाजण्याच्या सुमरास गगनबावड्यानजीक मोकाट कुत्र्यांनी एका सांबराचा पाठलाग कऊन, त्यांची शिकार करण्याचा प्रयत्न सुऊ केला. पण मोकाट कुत्र्यांच्या पाठलागमुळे भेदरलेल्या सांबराने, जीव वाचविण्यासाठी तलावात उडी मारली. यांची माहिती समजताच गगनबावड्याचे उपसरपंच मुस्ताक वडगावे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यासर्वांनी तलावात उडी टाकलेल्या सांबराला तलावातून बाहेर काढण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरू केले. पण त्यांच्या प्रयत्नाला अपयश आल्याने, सांबराचा तलावाच्या पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला. त्या मृत सांबराचा मृतदेह तलावाच्या पाण्यातून बाहेर काढून, त्यांचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित शवविच्छेदन करण्यात आले.