महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू

04:37 PM Jan 12, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

नेमळे येथे राष्ट्रीय महामार्गांवरील घटना

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

नेमळे गावकर कुंभारवाडी येथे राष्ट्रीय महामार्गांवर पहाटे वाहनाच्या धडकेने मादी जातीच्या सांबराचा जागीच मृत्यू झाला. हे सांबर जंगलातून वायंगणी भातशेती मध्ये हायवे पार करून जात असताना हा अपघात झाला . सकाळी वनरक्षक रमेश पाटील, बबन रेडकर यांना संदेश मिळताच अपघातग्रस्त मृत सांबराचा पंचनामा करून ग्रामस्थांच्या मदतीने जंगला शेजारी दफन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग सुरु झाल्या पासून या महामार्गांवर सांबर,कटींदर, शेखरू. अशा दुर्मिळ प्राण्याचे अपघात नेमळे ते मळगाव या भागामध्ये वारंवार होत आहेत. यावर हायवे शेजारील जंगलाच्या कडेने काहीतरी वनविभागाने उपाययोजना करावी अशी मागणी उपसरपंच सखाराम राऊळ यांनी वनकर्मचाऱ्यांकडे केली आहे . यावेळी वनपाल विजय पांचाळ, वनरक्षक रमेश पाटील ,बबन रेडकर नेमळे उपसरपंच सखाराम राऊळ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement
Tags :
# tarun bharat news# nemle # Sambar died
Next Article