For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्रीडा क्षेत्राच्या सामग्रीसाठी ‘समर्थ पुढाकार’

06:45 AM Feb 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
क्रीडा क्षेत्राच्या सामग्रीसाठी ‘समर्थ पुढाकार’
Advertisement

खेलो इंडिया मिशन’समवेत क्रीडाक्षेत्राला मोठा बूस्ट

Advertisement

केंद्रीय अर्थसंकल्पात क्रीडाक्षेत्राला मजबुती देण्याच्या दिशेने महत्त्वाच्या पुढाकाराची घोषणा केली आहे. क्रीडासाहित्याची निर्मिती आणि गुणवत्ता सुधारासाठी ‘समर्थ पहल’ नावाच्या नव्या पुढाकाराचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.  या पावलाला भारतातील क्रीडा उद्योग आणि क्रीडासाहित्य निर्मिती क्षेत्रासाठी मोठे प्रोत्साहन मानण्यात येत आहे.

अर्थमंत्र्यांनी स्वत:च्या अर्थसंकल्पीय भाषणात ‘खेलो इंडिया मिशन’ची घोषणा करत हे मिशन पुढील एक दशकात भारताच्या क्रीडा क्षेत्राला पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करणार असल्याचे म्हटले आहे. सरकारचे लक्ष केवळ क्रीडापटूंची संख्या वाढविणे नसून पूर्ण क्रीडाव्यवस्थेला मजबूत करणे आहे. यंदा आशियाई क्रीडास्पर्धा आणि राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणार असल्याचे ही तरतूद महत्त्वाची ठरणार आहे.

Advertisement

खेलो इंडिया मिशन 5 स्तंभांवर आधारित

खेलो इंडिया मिशन पुढील 10 वर्षांमध्ये भारतीय क्रीडाक्षेत्राचा कायापालट घडवून आणणार आहे. याच्या अंतर्गत प्रतिभा विकासापासून मूलभूत सुविधा, तंत्रज्ञान प्रत्येक स्तरावर एक समग्र व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. खेलो इंडिया मिशनला 5 प्रमुख टप्प्यांमध्ये लागू करण्यात येणार आहे, जेणेकरून तळागाळापासून आंतरराष्ट्रीय व्यासपीठांपर्यंत क्रीडापटूंना एक मजबूत आणि निरंतर विकासाचा मार्ग मिळू शकेल.

1 इंटीग्रेटेड टॅलेंट डेव्हलपमेंट पाथवे

या मिशन अंतर्गत प्रशिक्षण केंद्रांचे जाळे तयार करण्यात येईल, जे तीन स्तरांवर काम करणार आहे..

फाउंडेशन लेव्हल (प्रारंभिक प्रतिभांसाठी)

इंटरमीडियट लेव्हल (उदयोन्मुख क्रीडापटूंसाठी)

एलिट लेव्हल (राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तराच्या क्रीडापटूंसाठी)

या व्यवस्थेद्वारे प्रतिभावंत क्रीडापटूंची ओळख लवकर पटेल आणि त्यांना योग्यवेळी योग्य प्रशिक्षण मिळू शकेल.

2 कोच अन् सपोर्ट स्टाफचा व्यवस्थित विकास

चांगल्या क्रीडापटूंमध्ये चांगले कोच आणि सपोर्ट स्टाफ सर्वात मोठी शक्ती असतात. खेलो इंडिया मिशन अंतर्गत कोच, फिटनेस ट्रेनर, फिजियोथेरपिस्ट आणि अन्य सपोर्ट स्टाफला सिस्टीमॅटिक आणि आधुनिक प्रशिक्षण देण्यात येईल, जेणेकरून क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय मापदंडांनुसार मार्गदर्शन मिळू शकेल.

3 सपोर्ट सायन्स अन् तंत्रज्ञानाचे एकीकरण

आधुनिक खेळ आता  केवळ मेहनत नव्हे तर डाटा, सायन्स आणि तंत्रज्ञानावर आधारित आहे. या मिशनमध्ये स्पोर्ट्स सायन्स, अॅनालिटिक्स, रिकव्हरी टेक्निक्स आणि नव्या तंत्रज्ञानांना प्रशिक्षण प्रक्रियेशी जोडले जाईल, याद्वारे क्रीडापटूंची कामगिरी आणि कारकीर्द दोन्ही सुरक्षित राहू शकतील.

4 स्पर्धा अन् लीग्स : क्रीडासंस्कृतीला बळ

खेलो इंडिया मिशन अंतर्गत नियमित स्पर्धा आणि लीग्स आयोजित केल्या जातील. याचा उद्देश क्रीडापटूंना अधिकाधिक सराव, ओळख आणि प्रोफेशनल व्यासपीठ मिळवून देणे आहे, जेणेकरून भारतात एक मजबूत क्रीडासंस्कृती विकसित होऊ शकेल.

क्रीडा सुविधांचा विकास

सरकार प्रशिक्षण आणि स्पर्धांसाठी क्रीडासुविधांचा विकास करणार आहे. यात आधुनिक स्टेडियम, प्रशिक्षण सुविधा, हॉस्टेल आणि सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर सामील असेल, ज्यामुळे क्रीडापटू देशात विश्वस्तरीय तयार करू शकतील.

क्रीडा उद्योगासाठी नवा पुढाकार

भारतात क्रीडाप्रकारांची वाढती लोकप्रियत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडापटूंची चांगली कामगिरी पाहता उच्च गुणवत्तेच्या उपकरणांची देशांतर्गत निर्मिती करण्याची गरज आहे. सरकार क्रीडासामग्रीच्या निर्मितीशी निगडित उद्योगांना तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि गुणवत्ता मापदंडांच्या स्तरावर समर्थन देणार आहे. क्रीडासामग्रीसाठी समर्थ पुढाकाराचा प्रस्ताव मांडत असून यामुळे उच्चगुणवत्तेचे क्रीडासाहित्य देशातच निर्माण होऊ शकेल असे सीतारामन यांनी म्हटले आहे.

उत्पादनाला थेट लाभ

सरकारचा हा पुढाकार केवळ क्रीडापटूंपरुती मर्यादित नाही, तर यामुळे मेक इन इंडियालाही मजबुती मिळणार आहे. क्रीडा उपकरणांच्या आयातीवरील निर्भरता कमी होईल आणि देशांतर्गत कंपन्यांना जागतिक बाजारात प्रतिस्पर्धी होण्याची संधी मिळणार आहे. यामुळे रोजगारनिर्मिती, लघू अन् मध्यम उद्योगांना बळ आणि भारताला स्पोर्ट्स गुड्स हब म्हणून ओळख मिळवून देण्यास मदत मिळणार आहे.

Advertisement
Tags :

.