वरुण धवनसोबत झळकणार समांथा
प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या वेबसीरिजसाठी निवड
समांथा रुथ प्रभू हे दक्षिणेतील प्रख्यात नाव आहे. समांथा आणि वरुण धवन हे एका चित्रपटात एकत्र दिसून येणार असल्याची चर्चा आहे. मार्शल आर्टवर आधारित ओटीटी प्रोजेक्ट दोघांनी स्वीकारल्याचे समजते.
समांथा अन् बॉलिवूड स्टार वरुण धवन हे एका वेबसीरिजमध्ये रोमांस करताना दिसून येणार आहेत. अभिनेत्रीच्या आगामी वेबसीरिजचे दिग्दर्शन हे ‘द फॅमिली मॅन2’चे निर्माते राज आणि डीके करणार आहेत. ही सीरिज ‘सिटाडेल’चे भारतीय रुपांतरण असणार असल्याची चर्चा आहे.
वेबसीरिजमधील प्रमुख कलाकार पुढील महिन्यापासून मार्शल आर्ट आधारित सीरिजसाठी प्रशिक्षण घेणार आहेत. ओटीटी प्रोजेक्टमधील ऍक्शन दृश्यांसाठी वरुण आणि समांथाला दिग्दर्शकांनी विशेष तयारी करण्यास सांगितले आहे.
समांथाचा राज आणि डीके सोबतचा हा दुसरा प्रोजेक्ट असणार आहे. समांथा सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘खुशी’च्या चित्रिकरणात व्यस्त असून यात ती विजय देवरकोंडासोबत दिसून येणार आहे. याचबरोबर ‘शांकुतलम’ आणि ‘यशोदा’ या चित्रपटांमध्ये ती काम करत आहे.